यावर्षी पंढरपूर येथील चैत्र यात्रा प्रतिकात्मक आणि मर्यादित स्वरूपात करण्याचा निर्णय !

कोरोनाच्या संसर्गाचा धोका लक्षात घेता पंढरपूर येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने यंदाच्या वर्षी साजरी होणारी चैत्र यात्रा प्रतिकात्मक आणि मर्यादित स्वरूपात करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती मंदिर समितीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

सातारा येथील ५ सोने दुकानदारांवर कारवाई

केवळ अत्यावश्यक सेवेतील दुकाने चालू ठेवण्याचे आदेश असतांनाही शहरातील ५ सोन्याच्या दुकानदारांनी दुकाने चालू ठेवल्यामुळे त्यांच्यावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

महाराष्ट्रातील विविध शहरांत शासकीय नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर पोलिसांची कारवाई !

राज्यातील मुंबई, नागपूर, पुणे यांसह विविध शहरांत विनाकारण आणि विनामास्क फिरणार्‍यांवर पोलिसांनी कारवाई केली, तसेच सहस्रो वाहनांवरही दंडात्मक कारवाई केली आहे. या वेळी काही शहरात नागरिकांना बाहेर पडण्याचे ठोस कारण न देता आल्याने पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली.

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सोहम् आश्रमाचे स्वामी सत्यानंद महाराज यांची घेण्यात आली भेट !

समितीचे श्री. सुनील घनवट आणि श्री. हरिकृष्ण शर्मा यांनी सोहम् आश्रमाचे स्वामी सत्यानंद महाराज यांची भेट घेतली. या वेळी श्री. घनवट यांनी महाराजांना समितीच्या कार्याविषयी माहिती दिली.

हिंदु राष्ट्राच्या कार्यात मी तुमच्या समवेत आहे ! – श्री महंत स्वामी कृष्णानंद महाराज, श्री आनंदाश्रम, हरिद्वार

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या कार्यात सर्वांनी संघटित होण्याची आवश्यकता आहे. या कार्यात मी तुमच्या समवेत आहे. सर्व संत एकत्रित प्रयत्न करूया, असे प्रतिपादन श्री महंत स्वामी कृष्णानंद महाराज यांनी केले.

पोलीस निरीक्षक प्रदीप काळे वारणा नदीच्या काठावर बेशुद्धवस्थेत आढळले

या संदर्भात स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक यांनी म्हटले आहे की, हत्या अथवा आत्महत्या करण्याचा प्रयत्न झालेला नाही. कोणत्याही प्रकारची साधी जखमही झालेली नाही. या संदर्भात पोलीस अधीक्षक अधिक खुलासा करणार आहेत.

‘पर्यटनस्थळ असलेल्या गोव्यात दळणवळण बंदी नको’, या गोवा शासनाच्या भूमिकेला केंद्राचा पाठिंबा ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

गोव्यात सद्यःस्थितीत दळणवळण बंदी लादलेली नसल्याच्या शासनाच्या भूमिकेची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रशंसा केली.

गोव्यात ४० वर्षांखालील २ रुग्णांसह एकूण चौघांचा कोरोनामुळे मृत्यू

‘टिका उत्सवा’चा वापर मतदारांना प्रभावित करण्यासाठी केल्यास ‘टिका उत्सव’ रहित करणार ! – राज्य निवडणूक आयोग

सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोना रुग्णांसाठी २०० अतिरिक्त खाटांची व्यवस्था

गतवर्षीच्या कोरोनाच्या संसर्गाचे प्रमाण पहाता आताचे प्रमाण तिप्पट आहे. त्यामुळे कठोर निर्बंधांशिवाय पर्याय नाही.

अमली पदार्थ व्यवसाय दक्षिण गोव्यापेक्षा उत्तर गोव्यात अधिक कळंगुट, हणजूण आणि पेडणे पोलीस ठाण्यांमध्ये सर्वाधिक प्रकरणे नोंद

उत्तर गोव्यात अमली पदार्थाचे सेवन करणारे केवळ पर्यटकच नव्हे, तर स्थानिक नागरिकही आहेत.