ईदच्या नमाजपठणासाठी देशातील अनेक भागांत कोरोना नियमांचे उल्लंघन !

हरिद्वारमधील कुंभमेळ्यावरून साधू-संतांवर टीका करणारे आता कुठे गेले ? कि असे उल्लंघन करण्याची अल्पसंख्यांकांना सूट आहे, असे त्यांना म्हणायचे आहे ?

नवी देहली – देशातील कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे केंद्र आणि राज्य प्रशासनांकडून दिशानिर्देश देण्यात आलेले आहेत. तरीही या नियमांचे उल्लंघन करत १४ मे या दिवशी रमझान ईदनिमित्त देशातील काही भागांतील मशिदींमध्ये आणि रस्त्यांवर सामूहिक नमाजपठण करण्यात आल्याचे दिसून आले. एएन्आय या वृत्तसंस्थेने या नमाजपठणांची छायाचित्रे प्रसारित केली आहे.

१. पंजाबच्या अमृतसरमधील जामा मशिदीच्या खैरुद्दीन हॉल बाजारमध्ये मोठ्या प्रमाणात मुसलमान एकत्र आले होते. पंजाबच्याच लुधियानाच्या जामा मशिदीबाहेर अशाच प्रकारची गर्दी दिसून आली. येथे रस्त्यावर नमाजपठण करण्यात आले. अनेकांनी मास्कही लावला नव्हता. याचा व्हिडिओही प्रसारित झाला आहे.

२. ईदपूर्वीच्या खरेदीच्या वेळीही काही ठिकाणी मोठ्या संख्येने मुसलमान खरेदी करतांना दिसून आले होते. तेलंगाणाची राजधानी भाग्यनगरमधील चार मिनार परिसरात ही गर्दी दिसून आली. या वेळी कोरोनाविषयीच्या कोणत्याही नियमांचे पालन करण्यात आले नाही.

३. मुंबईतील मुसलमानबहुल भेंडीबाजार, देहलीतील सीलमपूर आणि उत्तरप्रदेशच्या फिरोजाबादमध्येही अशीच गर्दी झाली होती.