माळशिरस तालुक्यातील ‘कोविड केअर सेंटर’मध्ये रुग्णांना तात्काळ औषधे उपलब्ध करून द्या !

‘कोविड केअर सेंटर’मध्ये उपचार घेत असणार्‍या २५० रुग्णांना औषधे उपलब्ध करून देण्यासाठी सरकारी स्तरावर प्रयत्न करावेत, अशी मागणी युवासेनेचे जिल्हाप्रमुख स्वप्निल वाघमारे यांनी शिवसेनेचे माजी मंत्री तानाजीराव सावंत यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

पुणे येथे कोरोनाच्या काळात ४० सहस्रांहून अधिक विवाह लांबणीवर

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लागू केलेली दळणवळण बंदी आणि नंतरच्या टप्प्यांवरील कडक निर्बंध यांमुळे गेल्या सव्वा वर्षात अनुमाने ४० सहस्रांहून अधिक विवाह लांबणीवर पडले आहेत.

कोरोनावर देशी दारूचा उपाय सांगणार्‍या शेवगाव (नगर) येथील आधुनिक वैद्याने दावा मागे घेतला

३ दिवसांपूर्वी डॉ. भिसे यांनी एक ‘पोस्ट’ लिहून कोरोना रुग्णाला काही दिवस प्रतिदिन ६० मिलीलीटर देशी दारू पाजल्यास कोरोना लवकर बरा होतो, असा दावा केला होता.

कोरोनाग्रस्त पित्यासाठी ऑक्सिजन सिलिंडर शोधणार्‍या मुलीकडे त्याच्या मोबदल्यात शारीरिक संबंधाची मागणी

अशी वासनांधांना सरकारने आजन्म कारागृहात टाकले पाहिजे ! अशा वेळी पोलीस स्वतःहून गुन्हा नोंदवून आरोपीला अटक का करत नाहीत ? कि त्यांना याचेही काहीच वाटत नाही ?

जीवनावश्यक वस्तूंचा काळाबाजार केल्यास गुन्हा नोंद करण्याची बेळगाव जिल्हाधिकार्‍यांची चेतावणी

जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढवून काळाबाजार केल्यास संबंधितांवर फौजदारी गुन्हा नोंद करण्यात येईल, अशी चेतावणी जिल्हाधिकारी एम्.जी. हिरेमठ यांनी दिली.

निधन वार्ता

म्हसवड (जिल्हा सातारा) – येथील सनातनच्या साधिका सौ. दुर्गा टकले यांच्या सासूबाई सौ. रुक्मिणी मधुकर टकले (वय ७५ वर्षे) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.

सांगली जिल्ह्यातील कोरोना रुग्णालयांची अचानक पहाणी करा ! – मयुर घोडके, शहरप्रमुख, शिवसेना

रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांच्या समस्या जाणून घ्याव्यात, त्या ठिकाणी ‘सी.सी.टी.व्ही.’ बसवावेत, अशा मागण्यांचे निवेदन शिवसेनेचे शहरप्रमुख श्री. मयुर घोडके आणि सरचिटणीस श्री. राहुल यमगर यांनी जिल्हाधिकार्‍यांना दिले आहे.

कोरोनाच्या काळात सावंतवाडी नगरपरिषदेकडून पत्रकारांसाठी १० खाटा राखीव ठेवणार ! – संजू परब, नगराध्यक्ष, सावंतवाडी

सावंतवाडीत रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

शिवप्रेमी सिंधुदुर्गच्या वतीने आज कुडाळ येथे रक्तदान शिबिराचे आयोजन

लस घेऊन स्वतःला सुरक्षित ठेवणे हे पुष्कळ महत्त्वाचे आहे; पण रक्तदान करून दुसर्‍याला सुरक्षित करणे, हेही तितकेच महत्त्वाचे आहे.

मळेवाड, रेडी आणि कासार्डे या ३ प्राथमिक आरोग्य केंद्रांना अत्याधुनिक ‘कार्डियाक’ रुग्णवाहिका देण्याची मागणी

मळेवाड, रेडी आणि कासार्डे या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपलब्ध असलेल्या रुग्णवाहिका वारंवार नादुरुस्त होत आहेत.