चिखली (जिल्हा बुलढाणा) येथील १० खासगी कोविड रुग्णालयांतील १३ आधुनिक वैद्यांचे सामूहिक त्यागपत्र !

खासगी रुग्णालयांतील आधुनिक वैद्यांकडून चुका होत असल्याचे निदर्शनास आल्यास लोकप्रतिनिधींनी त्या दाखवून त्यांच्याकडून योग्य पद्धतीने सेवा करवून घ्यावी; मात्र आधुनिक वैद्यांच्या कामात सतत ढवळाढवळ करू नये !

रुग्णालयातील खाटांचा काळाबाजार करणार्‍यांच्या विरोधात गुन्हा नोंदवा ! – इक्बालसिंह चहल, आयुक्त, मुंबई महानगरपालिका

महानगरपालिकेच्या रुग्णालयांत उपलब्ध खाटांचा नियमित आढावा घ्यावा, तसेच खाटांची विक्री करून काळाबाजार करणार्‍यांच्या विरोधात गुन्हा नोंदवा, असे आदेश मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी दिले आहेत.

बलोपासना करून भक्ती, शक्ती आणि मनोबल वाढवा ! – विजय चौधरी, हिंदु जनजागृती समिती

– देशाची सध्याची स्थिती पुष्कळ विदारक आहे. सर्वत्र नक्षलवाद, हिंसाचार, बलात्काराच्या घटना दिवसागणिक वाढतच आहेत. हिंदूंच्या मंदिरांची तोडफोड करणे, संतांची हत्या करणे, काश्मिरी हिंदूंची हत्या असे अनेक आघात होत आहेत. यावरून हिंदू किती असुरक्षित आहेत, हे लक्षात येते.

हिंदूंनी स्वतःच्या आणि कुटुंबाच्या रक्षणासाठी स्वरक्षण प्रशिक्षण शिकणे आवश्यक ! – हर्षद खानविलकर, युवा संघटक, हिंदु जनजागृती समिती

हिंदू शौर्यशाली आणि पराक्रमी आहेत, केवळ त्यांना जागृत करण्याची आज आवश्यकता निर्माण झाली आहे. हिंदूंनी शौर्य गाजवून देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. यासाठी कित्येक क्रांतीकारकांना बलीदान द्यावे लागले आहे; पण दुर्दैव असे की, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सर्वपक्षीय शासनकर्त्यांनी हिंदूंची….

महाराष्ट्रातील दळणवळण बंदीमध्ये १ जूनपर्यंत वाढ, निर्बंध अधिक कडक

महाराष्ट्रातील दळणवळण बंदी १ जूनपर्यंत वाढवण्यात आली. राज्यशासनाकडून याविषयीची मार्गदर्शक तत्त्वे घोषित करण्यात आली आहेत. यामध्ये निर्बंध अधिक कडक करण्यात आले आहेत. अन्य राज्यांतून महाराष्ट्रात येणार्‍या नागरिकांसाठी ‘आर्टीपीसीआर्’ चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांची सदिच्छा भेट !

मुंबई उच्च न्यायालयाच्या आवारात चालू असलेल्या कोरोनावरील लसीकरणाचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री तेथे पोचले होते; मात्र तेथे त्यांनी न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांची भेट घेतली.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना अ‍ॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत तूर्तास अटक नाही !

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यावर अ‍ॅट्रॉसिटी कायद्यातंर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे; मात्र तूर्तास त्यांना अटक करण्यात येणार नाही, असे आश्‍वासन राज्य सरकारच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात देण्यात आले आहे.

मराठा आरक्षणाच्या निकालावर केंद्र सरकारची सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका

सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारने दिलेले मराठा आरक्षण रहित केले. केंद्र सरकारने या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका प्रविष्ट केली आहे. राज्य सरकारने अशी याचिका प्रविष्ट केलेली नाही.

नगर येथे कोरोनाबाधित रुग्णांच्या नातेवाइकांना आधुनिक वैद्यांकडून मारहाण

समाजात कोरोना महामारीने हाहा:कार झालेला असतांना सामंजस्याने न वागता अशाप्रकारे एकमेकांना मारहाण करण्याने समाजात अराजकच पसरेल !

भिंगार (जिल्हा नगर) येथे भग्नावस्थेत पडलेल्या मूर्ती वहात्या पाण्यात विसर्जन करणारे हिंदु राष्ट्र सेनेचे सतीश (नाना) मोरे !

श्री. नाना मोरे म्हणाले, ‘‘नगर येथील कॅन्टोन्मेंट हॉस्पिटलच्या समोरही देवतांच्या मूर्ती आणि प्रतिमा जळलेल्या अवस्थेत होत्या. त्या पाहून डोळ्यात पाणी आले. हिंदूंनी आपल्या देवतांविषयी संवेदनशील राहून आपल्याच हातून होणारे आपल्या देवतांचे विडंबन थांबवावे.