धर्माचे रक्षण, धर्माचरण या कृती आपल्‍या घरापासूनच कराव्‍या लागतील ! – अधिवक्‍ता अभिषेक भगत

महोत्‍सवाच्‍या प्रारंभी श्री व्‍यासपूजा आणि प.पू. भक्‍तराज महाराज यांचे प्रतिमापूजन करण्‍यात आले. या वेळी स्‍वसंरक्षण प्रात्‍यक्षिके दाखवण्‍यात आली. शेवटी सर्वांनी हिंदु राष्‍ट्र स्‍थापण्‍याच्‍या कार्यात सहभागी होण्‍याची शपथ घेतली.

पिंपरी (पुणे) येथे धर्मांध शिंप्‍याचे १० वर्षीय मुलीसोबत अश्‍लील चाळे !

अल्‍पवयीन मुलींवरील अत्‍याचाराच्‍या वाढत्‍या घटना पहाता कायदा आणि सुव्‍यवस्‍था सक्षम करण्‍यासह अशा धर्मांध विकृतांवर कठोर कारवाई होणे आवश्‍यक आहे !

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, कोल्‍हापूरकडून आरोग्‍य शिबिर !

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा ९ जुलैला ७५ वा स्‍थापना दिवस देशभरात मोठ्या उत्‍साहात साजरा करण्‍यात आला. या अमृत महोत्‍सवी वर्षाच्‍या निमित्ताने कोल्‍हापूर शहरातील कावळा नाका सेवा वस्‍तीत आरोग्‍य शिबिर घेण्‍यात आले.

औरंगाबाद नावात तूर्तास कोणताही पालट न करण्‍याचे जिल्‍हाधिकार्‍यांचे आदेश !

जिल्‍ह्याच्‍या नामांतराच्‍या सूत्रावरून जिल्‍हाधिकारी यांनी महत्त्वाचे आदेश काढले आहेत. सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांनी तूर्तास औरंगाबाद विभाग, जिल्‍हा, उपविभाग, तालुका आणि गाव यांच्‍या नावात कोणताही पालट करू नये, असे आदेश येथील जिल्‍हाधिकारी आस्‍तिककुमार पाण्‍डेय यांनी ४ जुलै २०२३ या दिवशी दिले आहेत.

मुंबईतील २ पर्यटकांचा लोणावळ्‍यात बुडून मृत्‍यू, एकाला वाचवण्‍यात यश !

सध्‍या पावसाळा चालू असल्‍याने लोणावळा आणि परिसरात वर्षाविहाराचा आनंद घेण्‍यासाठी ठिकठिकाणी पर्यटक येत आहेत. येथील वरसोली गावामध्‍ये वर्षाविहारासाठी मुंबईतील ३ पर्यटक आले होते.

पुणे येथे ‘ऑनलाईन रमी’ मध्‍ये हरल्‍याने तरुणाची नैराश्‍यातून आत्‍महत्‍या !

प्रलोभनांना बळी न पडण्‍यासाठी धर्मशिक्षणाची आवश्‍यकता आहे ! मनुष्‍य साधना करत असेल, तर तो संयमी, नीतीमान होतो. त्‍यामुळे तो अशा प्रलोभनांना बळी पडत नाही !

अवजड वाहनांसाठी वरंध घाटातील वाहतूक बंद करण्‍याचा निर्णय !

या रस्‍त्‍यासाठी राष्‍ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने ८२३ कोटी रुपये संमत केले आहेत; मात्र या कामाची निविदा प्रक्रिया अद्याप चालू झालेली नाही.

कोल्‍हापूर जिल्‍ह्यातील बसस्‍थानक सुशोभिकरणाचा प्रस्‍ताव अंतिम टप्‍प्‍यात

‘एस्.टी. बसस्‍थानक दत्तक योजना’ घोषित केली आहे. या अंतर्गत कोल्‍हापूर जिल्‍ह्यातील २४ बसस्‍थानकांचे सुशोभिकरण करण्‍यात येणार आहे. यांसाठी उद्योजक, व्‍यापारी संस्‍था यांच्‍याकडे सूचना मागवण्‍यात आल्‍या आहेत.

कोयना धरणात २१.५७ टी.एम्.सी. पाणीसाठा !

कोयना धरणामध्‍ये पाण्‍याची आवक वाढली असली, तरी धरणातील पाणीसाठा लक्षात घेता कोयना चौथ्‍या टप्‍प्‍यामध्‍ये निर्माण होणारी वीजनिर्मिती अजूनही बंद ठेवण्‍यात आली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘लोकमान्‍य टिळक’ राष्‍ट्रीय पुरस्‍कार घोषित !

‘लोकमान्‍य टिळक स्‍मारक ट्रस्‍ट’च्‍या वतीने देण्‍यात येणारा ‘लोकमान्‍य टिळक’ राष्‍ट्रीय पुरस्‍कार या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घोषित झाला आहे. ‘टिळक स्‍मारक ट्रस्‍ट’चे विश्‍वस्‍त डॉ. रोहित टिळक यांनी १० जुलै या दिवशी झालेल्‍या पत्रकार परिषदेत या पुरस्‍काराची घोषणा केली.