पुणे – येथील तळेगाव दाभाडेमध्ये ‘ऑनलाईन रमी’मध्ये हरल्याने २० सहस्र रुपये गमवावे लागले. त्यामुळे गणेश काळदंते या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. गणेश हा ‘कॅब’ चालक होता. तो स्वतःची गाडी चालवायचा; परंतु या व्यतिरिक्त त्याला ‘ऑनलाईन रमी’ खेळण्याचे व्यसन होते, अशी माहिती तळेगाव दाभाडे पोलिसांनी दिली आहे.
संपादकीय भूमिका :प्रलोभनांना बळी न पडण्यासाठी धर्मशिक्षणाची आवश्यकता आहे ! मनुष्य साधना करत असेल, तर तो संयमी, नीतीमान होतो. त्यामुळे तो अशा प्रलोभनांना बळी पडत नाही ! |