महाराष्ट्रात गेल्या ७ मासांत अनुमाने २९ कोटी लिटर मद्याची विक्री
राज्यात देशी आणि विदेशी मद्य, तसेच वाईनची विक्री गत ३ मासांपासून पूर्ववत् झाली आहे. गत ७ मासांत अनुमाने २९ कोटी लिटर मद्याची विक्री झाली आहे. मद्य विक्रीतून मिळणार्या महसुलाचे चालू आर्थिक वर्षातील वार्षिक उद्दिष्ट १९ सहस्र २२५ कोटी रुपयांचे आहे.