फोंडा वीजकेंद्राची तातडीने दुरुस्ती करा ! – औद्योगिक वीजग्राहकांची मागणी

वीज केंद्रातील ट्रान्सफॉर्मरचे (जनित्राचे) आयुष्य सरासरी २५ ते ३० वर्षांचे असते; परंतु फोंडा वीजकेंद्रातील बहुतेक ट्रान्सफॉर्मर हे ५० वर्षे जुने असून या वीजकेंद्राला मोठ्या प्रमाणावर दुरुस्तीची आणि हे वीजकेंद्र अद्ययावत् करण्याची तातडीने आवश्यकता आहे, असे औद्योगिक वीजग्राहकांचे म्हणणे आहे.

महाराष्ट्र विधीमंडळात ‘शक्ती’ कायद्याचे विधेयक सादर

शक्ती कायद्याचे विधेयकात आरोपीला २१ दिवसांत शिक्षेची तरतूद आहे. यामध्ये फाशी आणि जन्मठेप या शिक्षांचाही समावेश आहे.

विधान परिषदेतील राज्यपालनियुक्त सदस्यांची नावे संमत न झाल्याने विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात वाद

सभागृहात वाद घालणारे नकोत, तर वाद सोडवणारे लोकप्रतिनिधी हवेत !

विधीमंडळाच्या कामकाजाची नियमावली निश्‍चित करावी ! – सुधीर मुनगंटीवार, भाजप

या वेळी सुधीर मुनगंटीवार म्हणाले, ‘‘सत्ताधारी पक्षाने पत्रकार परिषदेत सर्व विधेयकांवर विस्तृत चर्चा करण्यात येणार असल्याचे सांगितले; मात्र एवढ्या अल्प वेळेत १० विधेयकांवर चर्चा कशी काय होणार ?

पुणे येथे इयत्ता आठवीतील मुलीच्या भ्रमणभाषवर येतात अश्‍लील संदेश

मुली आणि महिला यांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न दिवसेंदिवस गहन होत चालला आहे, यावरून समाजाचे किती अधःपतन होत आहे, हेच लक्षात येते.

सातारा शहर शिवसेनेच्या वतीने इंधन दरवाढीच्या विरोधात शिवतीर्थावर निदर्शने

कोरोनामुळे आधीच सर्व नागरिक डबघाईला आले आहेत. त्यातच ही इंधन दरवाढ नागरिकांना न पेलवणारी आहे.

नवी मुंबई येथील बाजार समितीमध्ये १ सहस्र २५१ बाटल्या रक्तसंकलन

राज्यात रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रक्तदान करण्याचे आवाहन केले आहे.

मनमानी करणार्‍या पुण्यातील खासगी शाळांच्या विरोधात कारवाई करण्याच्या मागणीसाठी पालकांचे आंदोलन !

शुल्क न भरणार्‍या विद्यार्थ्यांचे ‘ऑनलाईन’ शिक्षण बंद करणार्‍या शाळांविरोधात शिक्षण विभागाने कारवाई करावी यासाठी १० डिसेंबर या दिवशी सकाळपासून सायंकाळपर्यंत पालकांनी आंदोलन केले होते.

वन्य प्राण्यांच्या घटना हाताळण्यासाठी पोलिसांना प्रशिक्षणही द्यायला हवे !

वन्य प्राणी मनुष्यवस्तीत येण्याच्या वाढत्या घटना लक्षात घेता यापुढे वनाधिकारी आणि पोलीस अधिकारी यांच्यातील नियमित संवाद वाढण्याची आवश्यकता आहे. या दोघांमध्ये योग्य समन्वय राहिल्यास घटनेची तीव्रता अल्प करणे शक्य आहे, असे अतिरिक्त प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्य जीव) सुनील लिमये यांनी सांगितले. 

हिंदु साम्राज्य विस्तारक श्रीमंत थोरले माधवराव पेशवे यांचे स्मरण करून  हिंदूंचा गौरवशाली इतिहास पुन्हा जागवूया ! – सुनील घनवट, महाराष्ट्र संघटक, हिंदु जनजागृती समिती

छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्य स्थापले, तर पेशव्यांच्या काळात हिंदवी साम्राज्याचा विस्तार झाला. त्याच हिंदु साम्राज्य विस्तारक श्रीमंत थोरले माधवराव पेशवे यांचे स्मरण करून हिंदूंचा गौरवशाली इतिहास पुन्हा जागवूया, असे प्रतिपादन श्री. सुनील घनवट यांनी केले.