बांगलादेशातून भारतात आलेल्या ३ लाख रुपयांच्या नोटा बनावट !

प्रतिकात्मक चित्र

नागपूर – बांगलादेशातून ३ लाख रुपयांच्या बनावट नोटा भारतात आणण्यात आल्याचा प्रकार उघड झाला. लोहमार्ग पोलिसांनी ७० सहस्र ५०० किंमतीच्या बनावट नोटा आरोपींकडून जप्त केल्या आहेत, तर उर्वरित नोटा त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी खर्च केल्या. रेल्वेस्थानकावर खाद्यपदार्थ घेतल्यानंतर ग्राहकाने विक्रेत्याला दिलेली ५०० रुपयांची नोट बनावट असल्याचे लक्षात आले. यानंतर वरील प्रकरणाचा उलगडा झाला. (देशाची अर्थव्यवस्था खिळखिळी करणार्‍यांना कारागृहातच डांबायला हवे ! – संपादक)

या प्रकरणी पोलिसांनी बंगाल येथून लखपर मंडल, मामून मंडल, इंद्रजित मंडल, तर पुणे येथून यमुना प्रसाद शाह, संतोष मंडल, किशोर शिंदे आणि शशिकला उपाख्य सानिका दौंडकर यांना अटक केली आहे. या टोळीचा प्रमुख इनामूल हक बनावट नोटांचा व्यवसाय करतो. सध्या तो मालदाच्या कारागृहात आहे.