जीवनावश्यक वस्तूंचा काळाबाजार केल्यास गुन्हा नोंद करण्याची बेळगाव जिल्हाधिकार्यांची चेतावणी
जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढवून काळाबाजार केल्यास संबंधितांवर फौजदारी गुन्हा नोंद करण्यात येईल, अशी चेतावणी जिल्हाधिकारी एम्.जी. हिरेमठ यांनी दिली.
जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढवून काळाबाजार केल्यास संबंधितांवर फौजदारी गुन्हा नोंद करण्यात येईल, अशी चेतावणी जिल्हाधिकारी एम्.जी. हिरेमठ यांनी दिली.
येथील माई रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार केले जातात. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी आपणाला कोरोनाचा संसर्ग होईल, या भीतीने रुग्णालयातील आधुनिक वैद्य आणि तेथील कर्मचारी यांच्यावर आक्रमण केले.
कोणत्याही संकटकाळात हिंदूंची मंदिरे नेहमी गरजवंतांना साहाय्य करतात.
कंग्राळ गल्ली येथील ज्येष्ठ पत्रकार आणि रा.स्व. संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक अर्जुनराव केदारी गौंडाडकर (वय ८२ वर्षे) यांचे ९ मे या दिवशी अल्पशा आजाराने निधन झाले. अर्जुनराव गौंडाडकर यांनी दैनिक पुढारीच्या कार्यालयात अनेक वर्षे सेवा केली.
दक्षिण भारतातील प्रसिद्ध नागक्षेत्र कुक्के सुब्रह्मण्य येथे कोरोना महामारीवर नियंत्रण आणण्यासाठी, तसेच लोककल्याणार्थ विशेष पूजेला प्रारंभ करण्यात आला आहे. ५ मे ते ११ मेपर्यंत एक सप्ताह पूजा, होम-हवन करण्यात येणार आहे.
विशाळगडावरील सर्व अतिक्रमणे तात्काळ हटवून, दोषी अधिकार्यांवर कठोर कारवाई करा, या मागणीचे निवेदन निपाणी येथील हिंदुत्वनिष्ठ अभिनंदन भोसले यांनी ई-मेलद्वारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, भारतीय पुरातत्व खाते यांच्याकडे पाठवले आहे.
भाजपचे खासदार तेजस्वी सूर्या यांनी शहरातील रुग्णालयांमधील खाटा मिळण्यासाठी लाच घेण्यात येत असल्याचा आरोप केल्यानंतर आता रुग्णालयांत ३ सहस्र २१० खाटा रिकामी असल्याचे या संदर्भातील संकेतस्थळावर दाखवण्यात येत आहे.
सूर्या यांनी आरोप करतांना म्हटले की, बेंगळुरू महानगरपालिकेचे अधिकारी, बाहेरील दलाल, कोविड वॉर रूम आणि कॉल सेंटरमधील प्रमुख हा घोटाळा करत आहेत. या रुग्णालयामध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे नसणार्या व्यक्तीच्या नावाने खाट आरक्षित करून ठेवली जाते
येथील महानगरपालिकाच्या कोविड वॉररूममध्ये मुसलमान सदस्यांची नियुक्त केल्यावरून भाजपचे खासदार तेजस्वी सूर्या यांनी या वेळी टीका केली. या वेळी त्यांनी ‘कोविड वॉररूम’साठी नेमणूक करण्यात आलेल्या १७ लोकांच्या सूचीतील नावे वाचून दाखवली.
‘भारतात अशी स्थितीही येईल’, असे कुणाला वाटले नव्हते; मात्र आपत्काळ येणार आहे, असे द्रष्टे, संत आदी सांगत होते, तेच अशा घटनांतून दिसत आहे !