छत्रपती संभाजीनगरमध्ये ‘लव्ह जिहाद’ आणि धर्मांतराचे षड्यंत्र उघड !
धर्मांध हुसेन अबू सोयदान याच्याविरुद्ध गुन्हा नोंद !

छत्रपती संभाजीनगर – दुबईत उच्च पगाराची नोकरी लावण्याचे आणि लग्नाचे खोटे आमीष दाखवून एका ४३ वर्षीय हिंदु विवाहित शिक्षिकेवर धर्मांध हुसेन अबू सोयदान याने अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. ‘दुबईत नोकरी करायची असेल, तर मुसलमान धर्म स्वीकारावा लागेल’, अशी अट घालून धर्मांधाने पीडितेचे धर्मांतर केले. इतकेच नव्हे, तर पीडितेकडून ३ लाख ४१ सहस्र रुपये रोख आणि ६ तोळे सोने लुटून आरोपी पसार झाला आहे. या प्रकरणी पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला असून तो दुबईला पळून गेल्याचे समजते.
Chhatrapati Sambhajinagar: Hindu teacher duped by Hussein Abu Soydan with promises of a job in Dubai; sexually assaulted, six tolas of gold and lakhs of rupees extracted.
A suspected ‘Love Jihad’ and conversion conspiracy has been exposed
A case has been registered, with a… pic.twitter.com/DmhCZUQnZH
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) June 8, 2026
सहकार्यानेच रचला ‘लव्ह जिहाद’चा सापळा !
पीडित महिला एका शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत होती. जून २०२४ मध्ये त्याच शाळेत शिकवणार्या हुसेन सोयदान याच्याशी तिची ओळख झाली. या ओळखीचे रूपांतर नंतर मैत्रीत झाले. नोव्हेंबर-डिसेंबर २०२५ मध्ये हुसेनने तिला आपल्या जाळ्यात ओढण्यास प्रारंभ केला. ‘तू मला आवडतेस. नवर्याला घटस्फोट दे आणि माझ्यासमवेत रहा’, अशी भुरळ घालून त्याने तिला दुबईत नोकरी लावण्याचे आमीष दाखवले. ४ जानेवारी या दिवशी निराला बाजार परिसरातील एका उपाहारगृहात नेऊन हुसेनने महिलेवर अत्याचार केला.
आरोपीची गुन्हेगारी पार्श्वभूमी आणि आर्थिक लूट !
पैशांची नड असल्याचे सांगून जानेवारी ते एप्रिल या काळात वेदांतनगर आणि सिडको परिसरातील उपाहारगृहात बोलावून महिलेकडून ३ लाख ४१ सहस्र रुपये रोख आणि ऑनलाईन स्वरूपात उकळले. परदेशात जाण्यासाठी आणि पासपोर्ट काढण्यासाठी प्रारंभी पदरमोड करावी लागेल, असे सांगून २० एप्रिल या दिवशी निराला बाजार येथील उपाहारगृहात महिलेकडून विश्वासाने ६ तोळे सोने लाटले. एप्रिलच्या प्रारंभी पीडितेच्या पतीला हा प्रकार समजल्यावर महिलेला घर सोडावे लागले. आरोपीने तिला गारखेडा भागात भाड्याचे घर घेऊन दिले आणि तिथे साहित्यखरेदीसाठी आणखी ५० सहस्र रुपये उकळले.
यू ट्यूबवर मंगलाष्टके लावून लग्नाचा बनाव आणि बलपूर्वक धर्मांतर !
१९ एप्रिल या दिवशी आरोपीने घरातच यू ट्यूबवर मंगलाष्टके लावून एकमेकांना माळा घालत हिंदु पद्धतीनुसार लग्नाचा खोटा देखावा केला; मात्र त्यानंतर लगेचच स्वत:चे खरे रूप दाखवत ‘दुबईत नोकरीसाठी यायचे असेल, तर मुसलमान धर्म स्वीकारावाच लागेल’, असे सांगून त्याने पीडित हिंदु शिक्षिकेला बलपूर्वक कलमा (अल्लाचा गौरव करणारी विधाने) वाचण्यास भाग पाडले आणि तिचे कथित धर्मांतर घडवून आणले.
फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पोलिसांत तक्रार !
२५ एप्रिलपासून आरोपीने महिलेशी संपर्क टाळण्यास प्रारंभ केला आणि लग्नाविषयी विचारणा केल्यावर उडवाउडवीची उत्तरे दिली. अंततः १ जूनपासून त्याचा भ्रमणभाष क्रमांक पूर्णपणे बंद झाल्याने स्वत:ची फसवणूक झाल्याचे महिलेच्या लक्षात आले. यापूर्वी पीडितेने तक्रार दिली होती; मात्र तेव्हा आरोपीने सामंजस्याची भूमिका घेतली. ठरल्याप्रमाणे तो न वागल्याने आता महिलेने पोलिसांत नवीन सविस्तर तक्रार दिली असून त्यामध्ये धर्मांतराच्या (जिहादी कृत्यांचा) स्पष्ट उल्लेख केला आहे. पोलीस या गंभीर प्रकरणाचे पुढील अन्वेषण करत आहेत.
गोमांसाची अवैधरित्या वाहतूक करणारा सरफराज ख्वाजा याला अटक
भिवंडी येथे खाऊचे आमीष दाखवून ७ वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार
संपादकीय : अवघ्या पावणे दोन मासांत शिक्षा !
छत्रपती संभाजीनगर येथे धर्मांध मुसलमानाच्या विरोधात गुन्हा नोंद !
लहान मुलांना सनातन धर्माची सोप्या भाषेत ओळख करून देणारे इंग्रजी भाषेतील पुस्तक प्रकाशित !
Dhubri Beef Arrest : धुबरी (आसाम) : गोमांस बाळगणार्या ५ जणांना अटक : गोमांस जप्त