डहाणू (जिल्हा पालघर) येथे लव्ह जिहाद; हिंदुत्वनिष्ठ संघटना आक्रमक !
आरोपीच्या अनधिकृत मालमत्तांवर बुलडोझर चालवण्याची मागणी !

पालघर – जिल्ह्यातील डहाणू येथे २ सख्ख्या हिंदु बहिणींना तरुणाने प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांची अश्लील छायाचित्रे काढली. त्यांचे चित्रीकरण करून त्यांना धमकावले. या प्रकरणी १ जूनला पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून आरोपी पसार आहे. या प्रकरणी हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि राजकीय पक्षांचे नेते आक्रमक झाले असून आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
१. आरोपीने मोठ्या मुलीशी मैत्री करून तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले आणि नंतर तिच्या अल्पवयीन लहान बहिणीशीही जवळीक साधली. त्यांना धमकावले अन् त्यांच्यावर अत्याचार केले. या प्रकरणी पीडित कुटुंबाने पोलिसांत तक्रार केली.
२. पालघर आणि डहाणू परिसरातील गरीब, तसेच आदिवासी हिंदु मुलींना फूस लावून त्यांच्यावर अत्याचार करण्यात येत आहेत. (या घटनांची पोलीस चौकशी करून सत्य उघड करतील का ? – संपादक)
३. ‘लव्ह जिहाद’ची माहिती मिळताच भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी डहाणू पोलीस ठाण्याला भेट दिली. त्यांनी आरोपीच्या अनधिकृत मालमत्तांवर तात्काळ बुलडोझर चालवण्याची मागणी केली आहे. या प्रकाराविषयी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
४. ‘गुजरात राज्याप्रमाणे महाराष्ट्रातही आंतरधर्मीय विवाहांच्या संदर्भात मुलीच्या कुटुंबियांना आधी अधिकृत माहिती देणारा कडक कायदा लागू करावा’, अशी मागणीही चित्रा वाघ यांनी केली.
संपादकीय : क्रिकेट आणि ‘हायब्रिड’ युद्ध !
ठाणे जिल्ह्यात विविध ठिकाणी घरफोड्या करणारे धर्मांध अटकेत
न्यायाधिशांच्या खुर्चीवर काळी जादू करणार्या महिलेला अटक
सिंहगडावर लावले ‘हा किल्ला हिंदूंचा, इथे मुसलमानांना प्रवेश नाही’ असे फलक !
थुंकणार्याकडून आता अडीच सहस्र रुपये दंड वसूल करा ! – मुंबई उच्च न्यायालय
शिवराज मोटेगावकर याने रसायनशास्त्राची प्रश्नपत्रिका मिळवण्यासाठी दिले ५ लाख रुपये !