बेळगाव शहरातील ‘माई’ रुग्णालयावर आक्रमण करणार्‍या ५० जणांवर गुन्हा नोंद

‘माई’ रुग्णालय बेळगाव

बेळगाव – येथील आधुनिक वैद्य मिलिंद हालगेकर यांच्या माई रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार केले जातात. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी आपणाला कोरोनाचा संसर्ग होईल, या भीतीने १० मे या दिवशी रुग्णालयातील आधुनिक वैद्य आणि तेथील कर्मचारी यांच्यावर आक्रमण केले. या प्रकरणी ५० हून अधिक जणांच्या विरोधात  शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
गेल्या काही मासांपासून आधुनिक वैद्यांवरील आक्रमणे वाढत आहेत. त्यामुळे पोलीस आणि जिल्हा प्रशासन यांनी आक्रमणकर्त्यांवर कडक कारवाई करावी; अन्यथा १७ मे पासून शहरातील रुग्णालयातील बाह्यविभाग बंद करण्याची चेतावणी ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’च्या बैठकीत देण्यात आली आहे.