कोणत्याही संकटकाळात हिंदूंची मंदिरे नेहमी गरजवंतांना साहाय्य करतात. याउलट अन्य धर्मियांच्या प्रार्थनास्थळांनी असे साहाय्य केल्याचे ऐकिवात नाही. हिंदूंच्या मंदिरांच्या नावाने नेहमी खडे फोडणारे बुद्धीप्रामाण्यवादी, अंनिसवाले हे लक्षात घेणार का ?
बेळगाव – दळणवळण बंदीमुळे शहरातील निराधार असलेल्या आणि रस्त्यावर रहाणार्या लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे. याची नोंद घेत गेल्या काही दिवसांपासून ‘श्री रेणुकादेवी मंदिर न्यासाद्वारे’ या लोकांना भोजन वितरित करण्यात येत आहे. शहरातील तानाजी गल्ली, समर्थ नगर, महाद्वार रोड आणि रेणुकादेवी मंदिर परिसर, रेल्वे उड्डाणपूल, पी.बी. रस्ता भागातील निराधार लोकांना मंदिर न्यासाद्वारे अन्न दिले जात आहे. ‘श्री रेणुकादेवी मंदिर न्यासा’चे राहुल मुचंडी, विनोद पुजारी, वसंत हलगेकर, यल्लाप्पा पाटील हे कार्य करत आहेत.