ज्येष्ठ पत्रकार आणि रा.स्व. संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक अर्जुनराव केदारी गौंडाडकर यांचे निधन

बेळगाव – कंग्राळ गल्ली येथील ज्येष्ठ पत्रकार आणि रा.स्व. संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक अर्जुनराव केदारी गौंडाडकर (वय ८२ वर्षे) यांचे ९ मे या दिवशी अल्पशा आजाराने निधन झाले. अर्जुनराव गौंडाडकर यांनी दैनिक पुढारीच्या कार्यालयात अनेक वर्षे सेवा केली. त्यांना मराठी भाषेविषयी पुष्कळ आत्मियता होती. त्यांच्या छोट्या नोंदवहीत भ्रमणभाष क्रमांक लिहितांना ते नेहमी मराठी आकड्यांचाच वापर करत.
मराठी भाषिक तरुणांनी चाकरीच्या मागे न लागता व्यवसाय करून प्रगती साधावी, असे ते सांगत. सामाजिक कार्यकर्ते आणि बेळगाव शिवजयंती चित्ररथ महामंडळाचे माजी अध्यक्ष शिवाजी गौंडाडकर यांचे ते वडील होत. त्यांच्या पश्‍चात ४ मुली, जावई, एक मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे.