‘यू ट्यूब’, ‘फेसबुक’ आणि ‘एक्स’ यांवरील १५ हून अधिक पोस्ट ब्लॉक

सिंगापूर – सिंगापूर सरकारने यू ट्यूब, फेसबुक आणि एक्स या ३ सामाजिक माध्यमांवरील १५ पोस्टस ब्लॉक करण्याचा आदेश दिला. या पोस्ट चीनशी संबंधित होत्या आणि त्यात भारतीय समुदायाला लक्ष्य करण्यात आले होते. या माध्यमातून सिंगापूरची सांस्कृतिक विविधतेची विचारसरणी दुर्बल करण्याचा प्रयत्न करण्यात येत होता. हे लक्षात घेता सिंगापूर सरकारने तातडीने या पोस्टस ब्लॉक केल्या. या गुन्ह्यासाठी ३ वर्षांपर्यंतचा कारावास आणि दंड अशी शिक्षा होऊ शकते.
Singapore blocks 14 social media posts on X, FB, and YouTube targeting the Indian community under the Online Criminal Harms Act (OCHA).
Authorities state the posts originated from an overseas China-based platform and targeted the local Indian community to incite racial discord.… pic.twitter.com/5Lq8XEV6Ut
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) June 7, 2026
सिंगापूरचे गृहमंत्री एडविन टोंग यांनी पत्रकारांना सांगितले की, आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार या पोस्टस परदेशातून करण्यात आल्या. यांतील व्हिडिओ आमच्या विविध वांशिक समाजव्यवस्थेवर आक्रमण करणार्या आणि लोकांमध्ये वांशिक आधारावर फूट पाडणार्या होत्या. सिंगापूरमध्ये प्रत्येक समुदायाला महत्त्व असून सर्वांना समान स्थान आहे. हे व्हिडिओ आमच्या समाजाचा पाया दुर्बल करण्याचा प्रयत्न आहेत. असा प्रयत्न करणारे कोणतेही कृत्य सरकार खपवून घेणार नाही. एका समुदायाला दुसर्या समुदायाविरुद्ध उभे करण्याचा हा प्रयत्न असून त्यास सर्व प्रकारे विरोध केला पाहिजे.
भारतातील ‘डेटा सेंटर्स’मुळे निर्माण होणारे जलसंकट !
Maharashtra ATS Raid : आंतकवादविरोधी पथकाच्या पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये २३ हून अधिक ठिकाणी धाडी !
UK Mandir Auction : ब्रिटनमध्ये लिलावात मंदिराची जागा मुसलमानांना विकली !
Iran US War : इराणचे हॉर्मुझमध्ये तेलवाहू नौकेवर आक्रमण : १ भारतीय ठार
भारतातील ‘डेटा सेंटर्स’मुळे निर्माण होणारे जलसंकट !
France Foils Islamic Terror : फ्रान्समधील ज्यू धर्मियांवरील संभाव्य आतंकवादी आक्रमण उधळले