मोकाट कुत्र्यांना आवरा !

लातूर – शहरामध्ये मोकाट कुत्र्यांचा त्रास पुष्कळ मोठ्या प्रमाणात वाढल्याने येथील भाजपच्या कार्यकत्र्यांनी आंदोलन केले. त्यांनी महापालिकेवर मोर्चा काढून महापालिकेला पिंजरा भेट दिला. त्यात ४ मोकाट कुत्रे होते. नुकताच मोकाट कुत्रा चावल्याने येथील तरुणाचा मृत्यू झाला आहे.