पीडितेची तक्रार; आरोपीला अटक
आरोपीवर ‘पॉक्सो’अंतर्गत गुन्हा नोंद
भिगवण (पुणे) – अल्पवयीन मुलीला भ्रमणभाष आणि संदेश (मेसेज) करून ‘जर तू बोलली नाहीस, तर गावात तुझी अपकीर्ती करीन. आई-वडिलांसह भावाला गायब करेन. घरच्यांना त्रास देईन’, अशी धमकी देऊन अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला. या प्रकरणी दौंड तालुक्यातील अनिकेत नगरे याला दौंड पोलिसांनी ‘पॉक्सो’अंतर्गत (लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण कायदा) अटक केली. अनिकेत हा ‘महाराष्ट्र राज्य मच्छिमार संघर्ष कृती समिती’चे पुणे जिल्हाध्यक्ष राजेंद्र नगरे यांचा मुलगा आहे. हा प्रकार ५ ते २५ मे या कालावधीत घडला. ३१ मे या दिवशी पीडित मुलीने तक्रार प्रविष्ट केली.
१. आरोपी अनिकेत याने पीडितेच्या भ्रमणभाषवर ५ मे या दिवशी लघुसंदेश केला. त्यानंतर ‘तू मला आवडतेस’, असा संदेश दिला. संबंधित मुलीने तो पुसून टाकला. त्यानंतर आरोपीने पीडितेच्या वडिलांच्या भ्रमणभाषवर संपर्क करण्यास प्रारंभ केला.
२. पीडितेने ‘संपर्क करू नकोस’, असे सांगितल्यावर तिला धमकी देण्यास आरंभ केला. याला घाबरून पीडिता ११ मे या दिवशी भेटायला गेली. पीडिता आल्यावर अनिकेतने छायाचित्र काढण्यास प्रारंभ केला आणि बळजोरीने हात पकडून विनयभंग केला.
३. २५ मे या दिवशी भ्रमणभाषवरून पुन्हा धमकी दिली. या त्रासाला कंटाळून पीडितेने अनिकेत याच्या विरोधात तक्रार केली.

हॉटेलवर कारवाई करणार्या पोलिसाचे निलंबन रहित !
चाकण (पुणे) येथील साहाय्यक पोलीस निरीक्षकाने मागितली १० लाख रुपयांची लाच
आषाढी यात्राकाळात पंढरपूरमध्ये मांस, मटण विक्रीवर बंदी !
कनिष्ठ न्यायालयाने दिलेला जामीन उच्च न्यायालयाकडून रहित
मी छत्रपती शिवाजी महाराजांचा पाईक असून मैदान सोडून जाणारा नाही !
आडाळी ‘एम्.आय.डी.सी.’मध्ये अवैधरित्या झालेल्या उत्खननाची उच्चस्तरीय चौकशी चालू !