भारतीय व्यापार्‍यांनी ‘हलाल अर्थव्यवस्थे’चा धोका ओळखून त्याला विरोध करणे आवश्यक ! 

हलाल अर्थव्यवस्थेविषयी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांचे कोल्हापूर येथे उद्योजकांसाठी व्याख्यान

कार्यक्रमात उपस्थितांना मार्गदर्शन करतांना श्री. रमेश शिंदे

कोल्हापूर, ७ जून (वार्ता.) – भारतात निधर्मी (सेक्युलर) राज्यघटना अस्तित्वात असतांना केवळ अल्पसंख्य मुसलमान समाजाला पाहिजे म्हणून धार्मिक आधारावर, ‘जमियत उलेमा ए हिंद’सारख्या मुसलमान संघटनेने हलाल अर्थव्यवस्था चालू करणे, हा राज्यघटनेचा अपमान आहे. प्रारंभी केवळ ‘मांसापुरती’ मर्यादित असलेले ‘हलाल प्रमाणपत्र’ दूध, तुलसी अर्क, साखर, ‘डेटिंग ॲप’, निवासी संकुल, शेअर बाजार यांपासून आज बहुतांश प्रत्येक जीवनोपयोगी उत्पादन ‘हलाल प्रमाणित’ आहे.

हिंदू घेत असलेली जवळपास प्रत्येक वस्तू ‘हलाल’असून हिंदूंच्या खिशातून जाणारा पैसा हा ‘हलाल’साठी खर्च केला जातो. वर्ष २०१३ मध्ये चालू झालेली हलाल अर्थव्यवस्था आज २.१ अमेरिकन ट्रिलियन डॉलर्सपर्यंत (१७९ लाख कोटी रुपयांहून अधिक) पोचली आहे. इतक्या अल्प कालावधीत ही अर्थव्यवस्था जर या गतीने वाढत असेल, तर ती भारतीय अर्थव्यवस्थेला उद्या आव्हान निर्माण करील, याचा विचार करायला हवा. त्यामुळे प्रत्येकाने ‘हलाल अर्थव्यवस्थे’च्या माध्यमातून निर्माण होणारा धोका ओळखून त्याला विरोध करणे अत्यावश्यक आहे, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी केले. ते ‘कोल्हापूर इंजिनिअरिंगच्या असोसिएशन’च्या सभागृहात बोलत होते. या प्रसंगी श्री. रमेश शिंदे यांचे स्वागत ‘असोसिएशन’चे अध्यक्ष श्री. कमलाकांत कुलकर्णी यांनी केले. स्वागत, प्रास्ताविक, वक्त्यांचा परिचय आणि आभारप्रदर्शन हिंदु जनजागृती समितीचे श्री. महेंद्र अहिरे यांनी केले. या प्रसंगी उद्योजिका सौ. मनीषा वाडीकर यांच्यासह ‘असोसिएशन’चे अनेक सभासद उपस्थित होते.

कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवर

१. जगातील १९३ देशांनी जर ‘भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरण’ (FSSAI) ला मान्यता दिली आहे, तर भारतात मात्र धर्मावर आधारीत ‘हलाल’ प्रमाणपत्राला आपण मान्यता का देतो ? ‘भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणा’ने जर एखाद्या पदार्थाच्या सर्व चाचण्या केल्यावर ‘यात मांसाशी संबंधित कोणतेही पदार्थ नाहीत’, असे सांगितले, तर त्यांच्यावर विश्वास न ठेवता आणखी एका ‘हलाल’ प्रमाणपत्राची आवश्यकता काय ?

२. ‘हलाल’मध्ये केवळ मुसलमानांच्या धार्मिकतेचा विचार केला असून यात हिंदूंसाठी पवित्र असलेली गोमातेच्या संदर्भातील कोणतेही उत्पादन वापरले जाणार नाही, याची कोणतीही निश्चिती देत नाही.

३. ‘हलाल’प्रमाणपत्र देणारी ‘जमियत उलेमा ए हिंद’ ही संघटना ७०० हून अधिक आतंकवाद्यांचे खटले लढवते आणि हा पैसा जे प्रमाणपत्र घेतात त्यांच्या माध्यमातून गोळा करत आहे. त्यामुळे ‘हलाल’चा पैसा आतंकवादासाठी वापरू द्यायचा का ? हे आपण आता ठरवण्याची वेळ आली आहे.

हिंदू जागृत नसल्याने अल्पसंख्यांकांचे इस्लामी ‘हलाल’ बहुसंख्य हिंदूंवर लादले जाते ! – रमेश शिंदे 

‘के.एफ्.सी.’, ‘मॅकडोनाल्ड’ सारख्या दुकानात गेल्यावर ‘आम्हाला न सांगता तुम्ही ‘हलाल’प्रमाणित उत्पादने का देता ? असा प्रश्न आपण त्यांना विचारत नाही. त्यामुळे त्यांचे फावते आणि हलाल प्रमाणित ‘पिझ्झा’, बर्गर आपण खातो. ही गोष्ट प्रत्येक ठिकाणी लागू आहे. मुसलमान ‘इस्कॉन’च्या ‘अक्षयपात्र’मधील माध्यान्ह आहार खात नाहीत, तर हिंदूंनी मुसलमान समाजासाठीची ‘हलाल प्रमाणित’ उत्पादने का घ्यावीत ? हिंदूंनी ‘ग्राहक तक्रार निवारण मंचा’कडे तक्रार करणे, अशा कृती करणे आवश्यक आहे.

आपले पाल्य भ्रमणभाषचा वापर कशासाठी करते ? याकडे प्रत्येक पालकाने सजगतेने पहाणे अत्यावश्यक ! – रमेश शिंदे 

जग आज गतीने पालटले असून तंत्रज्ञान अत्यंत गतीने विकसित होत आहे. संपर्काची अत्याधुनिक साधने उपलब्ध आहेत. ‘ए.आय.’मुळे जगातील सर्व सीमा संपलेल्या आहेत; मात्र सीमा संपलेल्या असल्या, तरी आपल्यापुढील समस्या संपल्या आहेत का ? हा महत्त्वाचा प्रश्न आहे. मुंबईतील ‘मुंब्रा’मधील धर्मांध तरुणांना उत्तरप्रदेशच्या आतंकवादी पथकाने अटक केली. या धर्मांध तरुणांनी अशा प्रकारचे ‘व्हिडिओ गेम’ सिद्ध केले होते की त्यातील प्रत्येक टप्पा पार करण्यासाठी ‘इस्लाम’मधील एक गोष्ट कृतीत आणली पाहिजे आणि यासाठी मोठ्या प्रमाणात आमीष दाखवले जात होते. त्यासाठी आपला पाल्य नेमके काय करतो ? भ्रमणभाषचा वापर कशासाठी करतो याकडे प्रत्येक पालकांनी सजगतेने पहाणे अत्यावश्यक आहे.