कर्जत बाजारपेठेत फेरीवाल्यांचे अतिक्रमण; सर्वसामान्यांना त्रास

प्रतीकात्मक छायाचित्र

कर्जत – कर्जत शहरातील मुख्य बाजारपेठेत फेरीवाले आणि दुकानदार यांनी रस्ते अडवल्याने लोकांना चालणे कठीण झाले आहे. याकडे नगर परिषद दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. नियमांनुसार पिवळ्या रेषेच्या आत व्यवसाय करणे बंधनकारक आहे; पण अनेक ठिकाणी या नियमांचे उल्लंघन होत आहे. काही दुकानदारांनी त्यांचे सामान दुकानाबाहेर रस्त्यावर मांडले. यामुळे रस्ता आणखी अरुंद झाला आहे.

या प्रकरणी मुख्याधिकारी तानाजी चव्हाण म्हणाले, ‘‘नागरिकांना रस्त्यावरून सुरक्षितपणे चालता यावे, यासाठी नगर परिषद योग्य ती कारवाई करील. रस्ते अतिक्रमणमुक्त केले जातील.’’

संपादकीय भूमिका

नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर नगर परिषद कारवाई कधी करणार ? ते जनतेला सांगावे !