पुणे – शहरात नोकरीनिमित्त आलेल्या एका हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून, तिचे धर्मांतर करण्यासाठी शारीरिक आणि मानसिक छळ केल्याची घटना समोर आली आहे. सज्जाद हामेदुद्दीन सैयद नामक जिहाद्याने लग्नाचे आमीष दाखवून पीडितेवर वारंवार अत्याचार केले आणि तिला घरात डांबून ठेवले होते. शेवटी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी या तरुणीची सुटका केली. (‘लव्ह जिहाद’ अस्तित्वातच नाही, असे म्हणणार्या ढोंगी पुरोगाम्यांच्या डोळ्यात अंजन घालणारी ही घटना आहे. ‘लव्ह जिहाद’चे हे क्रूर वास्तव जाणून हिंदु तरुणींनो, आता तरी सावध व्हा ! या भीषण परिस्थितीवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी आणि हिंदूंच्या रक्षणासाठी आता अशा वासनांध आणि धर्मांध प्रवृत्तींच्या विरोधात कठोर कायदे होणे आवश्यक आहे. – संपादक)
Where are the 'progressives' who claim 'Love Jihad' doesn't exist? Look at Pune!
A Hindu girl was trapped under the pretext of marriage, confined, and brutally tortured for conversion by Sajjad Syed.
When she refused to convert, he drugged her food and repeatedly assaulted her… pic.twitter.com/OJdhNkns2i
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) June 9, 2026
पीडित तरुणी जानेवारी महिन्यात पुणे येथे नोकरीसाठी आली होती. तिथे तिची ओळख ‘एक्सप्रेस बीस’मध्ये काम करणार्या सज्जाद सैयद याच्याशी झाली. लग्नासाठी सज्जादने आधी धर्मांतर करावे लागेल, अशी अट घातली. तरुणीने धर्मांतरास स्पष्ट नकार दिला असता, सज्जादने तिला स्वत:च्या खोलीवर बोलावून खाण्यातून गुंगीचे औषध दिले. अशा बेशुद्धावस्थेत त्याने तिच्यावर वारंवार बळजोरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले.
पोलीस साहाय्याला न आल्याने बजरंग दलाचा आधार !
पीडितेने संकटाच्या वेळी पोलिसांना दूरभाष केला; मात्र तिथून तिला कोणतेही साहाय्य मिळाले नाही. शेवटी तिने बजरंग दलाच्या सदस्यांशी संपर्क साधला. हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांनी तातडीने तिथे पोचून तरुणीची त्या जिहाद्याच्या तावडीतून सुटका केली आणि तिला सुरक्षित स्थळी पोचवले. (जनतेच्या रक्षणाचे दायित्व असलेल्या पोलिसांची ही निष्क्रीयता आणि अनास्था अत्यंत संतापजनक आहे. जर पोलिसांनी वेळीच पावले उचलली असती, तर पीडितेला तात्काळ न्याय मिळाला असता. पोलिसांच्या या ढिसाळ कारभारामुळेच गुन्हेगारांचे मनोबल वाढते, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. – संपादक)


पुणे येथे अधिवक्ता एस्.के. जैन यांना ‘जीवन गौरव पुरस्कार’ !
पानशेत (पुणे) पूरग्रस्त सोसाट्यांचे प्रश्न ६५ वर्षांनंतरही प्रलंबित !
हडपसर येथे हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्याला साहिल शेख आणि त्याच्या टोळीकडून बेदम मारहाण !
पुणे शहरात १९ जुलैला ‘श्री जगन्नाथ रथयात्रा महोत्सव’ !
महिलेच्या छातीला स्पर्श करणे, हा बलात्काराचा प्रयत्न नाही ! – उच्च न्यायालय
Railway Bedsheets Theft : रेल्वेच्या वातानुकूलित डब्यांमधून चादर, ब्लँकेट आणि टॉवेल चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये वाढ !