इस्लाममधून बाहेर काढण्याची धमकी

थिरूवनंतपूरम् (केरळम्) – केरळम्मधील ‘इंडियन युनियन मुस्लिम लीग’च्या पहिल्या महिला आमदार फातिमा तहलिया यांनी एका रेस्टॉरंटच्या उद्घाटनाच्या वेळी पारंपरिक दिवा, म्हणजेच ‘निलाविलक्कु’ प्रज्वलित केल्यावरून इस्लामी संघटनांच्या मौलवींनी (इस्लामच्या धार्मिक नेत्यांनी) आक्षेप घेतला असून या कृत्याला ‘गुन्हा’ म्हटले आहे. फातिमा तहलिया यांनी या प्रकरणी प्रतिक्रिया व्यक्त करण्यास नकार दिला आहे.
Kerala's first woman MLA, Fathima Thahiliya of the IUML, is facing criticism from hardliners and threats of expulsion from Islam for simply lighting a traditional lamp at a restaurant inauguration.
If lighting a lamp is considered unacceptable, why are Hindus alone expected to… pic.twitter.com/cXdQHQFD6C
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) June 7, 2026
‘समस्त केरळ जमिय्यतुल उलमा’ या संघटनेने तिच्या बैठकीत या कृत्यावर ‘निलाविलक्कु’ लावणे ही इस्लामी परंपरा नाही.’ कोणत्याही मुसलमानाने असे करणे हे इस्लामच्या शिकवणीच्या विरोधात मानले जाईल. जर एखादा मुसलमान मुसलमानेतर धार्मिक मान्यतेच्या आधारावर असे करत असेल, तर तो इस्लाममधून बाहेरही होऊ शकतो. तसेच केवळ परंपरा किंवा अनुकरण म्हणून असे करणे सुद्धा ‘हराम’ (इस्लामनुसार अयोग्य) आणि गुन्ह्याच्या श्रेणीत येईल.
संघटनेचे नेते अब्दुल हमीद फैजी अंबालाक्कदावू यांनी म्हटले की, इस्लाम त्याच्या अनुयायांना इतर धर्मांच्या परंपरांचे पालन करण्याची अनुमती देत नाही.
भ्रष्ट पोलीस धर्मांध आरोपींना पाठीशी घालत आहेत ! – हिंदु संघटनांचे गंभीर आरोप
‘कॉर्पोरेट’ (व्यावसायिक) नव्हे, धर्मांतर आणि बलात्कार यांचे केंद्र !
बंगाल बोध : घुसखोरांना साहाय्य हा देशद्रोह नव्हे का ?
पुणे येथे हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचे धर्मांतर करण्यासाठी शारीरिक आणि मानसिक छळ !
भारतीय व्यापार्यांनी ‘हलाल अर्थव्यवस्थे’चा धोका ओळखून त्याला विरोध करणे आवश्यक !
२ सख्ख्या हिंदु बहिणींचा छळ करणार्या पसार आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद !