कोरोनामुळे मुरगाव तालुक्यात ५० बळी

राज्यात आतापर्यंत कोरोनामुळे मुरगाव तालुक्यात सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. कोरोनामुळे राज्यात आतापर्यंत ७० हून अधिक जणांचे निधन झाले आहे आणि यामधील मुरगाव तालुक्यातील ५० जण आहेत.

गोवा वैद्यकीय महाविद्यालयातील २३ डॉक्टर कोरोनाबाधित

गोवा वैद्यकीय महाविद्यालयात आतापर्यंत २३ डॉक्टर आणि १३ परिचारिका कोरोनाबाधित झालेे आहेत. मडगाव येथील कोरोना रुग्णालयातील डॉक्टर आणि परिचारिका यांच्यापेक्षा गोवा वैद्यकीय महाविद्यालयात कोरोनाबाधित डॉक्टर आणि परिचारिका यांची संख्या अधिक आहे.

राज्यातील १२ आमदारांच्या विरोधातील अपात्रता याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी

काँग्रेस आणि मगोप यांनी राज्यातील एकूण १२ आमदारांच्या विरोधात प्रविष्ट केलेल्या अपात्रका याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात २४ जुलै या दिवशी सुनावणी होणार आहे.

गोवा विधानसभेच्या २७ जुलै या दिवशी होणार्‍या पावसाळी अधिवेशनात प्रवेशासाठी अनेक निर्बंध

गोवा विधानसभेचे एकदिवसीय पावसाळी अधिवेशन सोमवार, २७ जुलै या दिवशी होणार आहे. या दिवशी विधानसभेत प्रवेश करण्यासाठी विधानसभा सचिवांनी अनेक निर्बंध घातले आहेत, तसेच नागरिकांना विधानसभेत प्रवेशबंदी करण्यात आली आहे.

तणावाखाली असलेल्या महिला आणि मुले यांच्यासाठी बांबोळी येथे ‘वन स्टॉप सेंटर’ उभारण्याचा शासनाचा निर्णय

तणावाखाली असलेल्या महिला आणि मुले यांच्यासाठी बांबोळी येथे ‘वन स्टॉप सेंटर’ उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. केंद्राच्या योजनेअंतर्गत हे केंद्र उभारले जाणार आहे.

१० वीच्या परीक्षांचा निकाल २८ जुलैला

इयत्ता १० वीच्या परीक्षांचा निकाल २८ जुलै या दिवशी दुपारी ४.३० वाजता घोषित केला जाणार आहे, अशी माहिती गोवा शालांत मंडळाने दिली.

पणजीचे आमदार बाबुश मोन्सेरात रुग्णालयात भरती

रक्तदाब वाढल्याने पणजीचे आमदार बाबुश मोन्सेरात यांना २३ जुलै या दिवशी गोवा वैद्यकीय महाविद्यालयात भरती करण्यात आले.

‘कृतार्थ म्हार्दोळ’ संघटनेच्या वतीने ‘ऑनलाईन’ श्री गणेश पूजाविधी

गणेशभक्तांची ही अडचण दूर करण्यासाठी ‘कृतार्थ म्हार्दोळ’ या संस्थेने तज्ञ पुरोहितांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्यक्ष पूजाविधीचे ध्वनीमुद्रण (ऑडिओ) आणि ध्वनीचित्रीकरण (व्हिडीओ) सिद्ध केले आहेत.

‘ऑनलाईन’ शिक्षणासाठी ‘स्मार्टफोन’ न मिळाल्याने नैराश्यातून एकोशी (गोवा) येथील १५ वर्षीय विद्यार्थ्याने केली आत्महत्या

अशा आत्महत्या रोखण्यासाठी मुलांना साधना शिकवणे आवश्यक आहे. साधनेमुळे नैराश्यावर मात करता येत असल्याच्या अनेक अनुभूती साधक विद्यार्थ्यांना येत आहेत !

‘आतंकवादाशी संबंध असलेल्या ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ या संघटनेवर पूर्णपणे बंदी घाला !’

‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ या संघटनेचा आतंकवादाशी संबंध आहे. या संघटनेवर गोव्यात पूर्णपणे बंदी घालावी, अशी मागणी ‘श्री परशुराम सेना’ या राष्ट्रप्रेमी संघटनेने गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची २९ मे या दिवशी भेट घेऊन त्यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.