धाटवाडी येथे ग्रामस्थांनी कालव्यात उतरून आंदोलन केल्यावर १५ दिवसांत दुरुस्तीचे काम पूर्ण करण्याचे प्रशासनाचे आश्‍वासन : आंदोलन मागे

आंदोलन केल्यावर १५ दिवसांत काम पूर्ण करण्याचे आश्‍वासन देणारे प्रशासन हे काम आधी का करू शकले नाही ? अशा प्रकारे प्रशासन आंदोलन करा मग मागण्यांची पूर्तता होईल, अशी नवीन कार्यपद्धत घालत आहे का ?

मोदी शासनाचा अपप्रचार करण्यात टुकडे-टुकडे गँग सक्रीय ! – गिरीराज सिंह, केंद्रीय मंत्री

केंद्रातील मोदी शासनाने केलेल्या चांगल्या कामगिरीविषयी अपप्रचार करण्यास टुकडे-टुकडे गँग आणि डावे सक्रीय असल्याचा आरोप केंद्रीय मासेमारमंत्री गिरीराज सिंह यांनी केला.

८ फेब्रुवारीपासून कोरोना महामारीच्या विरोधात आघाडीवर लढणार्‍या कर्मचार्‍यांसाठी लसीकरण मोहीम

कोरोना लसीकरणासाठी नोंदणी करण्यासाठी ७ फेब्रुवारी ही अंतिम दिनांक असल्याने ही संख्या आणखी वाढू शकते.

(म्हणे) गोमंतकीय जनता काँग्रेसवर विश्‍वास ठेवील, असा पक्षात पालट करू ! – दिनेश गुंडू राव, काँग्रेस

काँग्रेस पक्षाने पक्षाचे ज्येष्ठ नेते रमाकांत खलप यांच्या नेतृत्वाखाली समन्वय समितीची नुकतीच स्थापना केली आहे. या समितीच्या पहिल्या बैठकीनंतर दिनेश गुंडू राव बोलत होते.

विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांच्या विरोधात अपात्रता याचिका

विरोधी पक्षनेते दिगंबर कामत भागीदार असलेले एक आस्थापन सरकारी कंत्राट घेत असल्याचा याचिकादाराचा आरोप आहे.

गोव्यात पेट्रोल आणि डिझेल यांच्या किंमतीत वाढ

राज्यात पेट्रोल आणि डिझेल यांच्या किंमतीत वाढ झाली अहे. पेट्रोल आणि डिझेल अनुक्रमे १ रुपया ३० पैसे आणि ६० पैसे असे महागणार आहे.

गोव्यातील खाण प्रश्‍नावरील सुनावणी पुन्हा पुढे ढकलली

ही सुनावणी आता २३ किंवा २४ फेब्रुवारी या दिवशी होण्याची शक्यता आहे.

राज्यातील ३ प्रकल्पांमुळे वन्यजीव नष्ट होणार असल्याने हस्तक्षेप करावा ! – आमदार विजय सरदेसाई यांची ‘युनेस्को’कडे मागणी

मोले ते वास्को राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण, कुळे ते वास्को रेल्वेच्या लोहमार्गाचे दुपदरीकरण आणि तम्नार ते गोवा उच्चदाबाची वीजवाहिनी या तिन्ही प्रकल्पांमुळे गोव्यातील वन्यजिवांना धोका निर्माण झाला आहे.

बाह्यशक्तींच्या साहाय्याने गोव्यात अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

बाह्यशक्तींच्या साहाय्याने गोव्यात अस्थिरता निर्माण करण्याचा विरोधक प्रयत्न करत आहेत. गोवा राज्य गेली अनेक मास हे भोगत आहे, असा आरोप मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केला.

तरंगत्या ६ कॅसिनोंकडून कचरा विल्हेवाटीसंबंधीच्या नियमांचा भंग !

नद्यांचे प्रदूषण करून शासनाला महसूल मिळवून देणारे कॅसिनो !