गोव्यातील खाण प्रश्‍नावरील सुनावणी पुन्हा पुढे ढकलली

फेब्रुवारीच्या अखेर सुनावणी होण्याची शक्यता

पणजी, ५ फेब्रुवारी (वार्ता.) – सर्वोच्च न्यायालयाने गोव्यातील खाण प्रश्‍नावरील सुनावणी पुन्हा पुढे ढकलली आहे. ही सुनावणी आता २३ किंवा २४ फेब्रुवारी या दिवशी होण्याची शक्यता आहे.

गोव्यातील खाण प्रश्‍नावरील याचिका सर्वोच्च न्यायालयाच्या ४ फेब्रुवारीच्या सूचीत समाविष्ट करण्यात आली होती. न्या. एम्.आर्. शहा आणि न्या. चंद्रचूड यांच्या नवीन खंडपिठासमोर ‘ऑनलाईन’ पद्धतीने ही सुनावणी होणार होती. ही सुनावणी आता पुढे ढकलण्यात आली आहे. सेझा गोवा, गोवा सरकार, फोमेंतो आणि २६ पंचायती यांनी गोव्यातील खाणी चालू करण्यासाठी याचिका प्रविष्ट केली आहे, तसेच ८८ खाणींचे लीज रहित करण्याची मागणीही यामध्ये करण्यात आली आहे.