गोव्यात पेट्रोल आणि डिझेल यांच्या किंमतीत वाढ

पेट्रोल १ रुपया ३० पैशांनी, तर डिझेल ६० पैशांनी महागणार

पणजी, ५ फेब्रुवारी (वार्ता.) – राज्यात पेट्रोल आणि डिझेल यांच्या किंमतीत वाढ झाली अहे. पेट्रोल आणि डिझेल अनुक्रमे १ रुपया ३० पैसे आणि ६० पैसे असे महागणार आहे. गोवा शासनाने पेट्रोलवरील मूल्यवर्धित करात (व्हॅट) २५ टक्क्यांवरून २७ टक्के, तर डिझेलवरील मूल्यवर्धित करात २२ टक्क्यांवरून २३ टक्के एवढी वाढ करण्याचा निर्णय घेतल्याने ही दरवाढ झाली आहे.