राज्यात लागू करण्यात आलेली ही दळणवळण बंदी नव्हे, तर केवळ निर्बंध असून आदेश नव्याने काढणे आवश्यक ! – मायकल लोबो, बंदर कप्तान मंत्री

जिल्हाधिकार्‍यांनी प्रसिद्ध केलेल्या दळणवळण बंदी आदेशात सुस्पष्टता नाही.

गृहअलगीकरणात असलेले कोरोनाबाधित रुग्ण सार्वजनिक ठिकाणी वावरत असल्याच्या तक्रारी

गोव्यात गृहअलगीकरणात असलेले कोरोनाबाधित रुग्ण कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला उत्तरदायी !

गोव्यात रेमडेसिवीर इंजेक्शन आणि ऑक्सिजन सिलिंडर यांचा काळाबाजार होत नाही !  मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

कोरोनाच्या रुग्णांसाठी राज्याच्या प्रशासनाकडून भारत सरकारने ऑक्सिजन पुरवठा करणार्‍यांची माहिती मागवली आहे.

गोव्यासाठी अर्धवेळ काम करणारे राज्यपाल गोव्यातील कोरोनाची परिस्थिती कशी हाताळू शकतील ?  दिगंबर कामत, विरोधी पक्षनेते

राज्यातील कोरोनाची स्थिती हाताळण्याविषयी विरोधी पक्षांनी दिलेल्या सकारात्मक सूचनांकडे स्थानिक भाजप शासन लक्ष देत नाही.

गोव्यात एकूण ३ लाख २० सहस्र लसीकरण

कोरोनांतर्गत वैद्यकीय उपचारासाठी ‘डी.डी.एस्.एस्.वाय्.’ योजनेअंतर्गत विम्याचे संरक्षण मिळणार

गोव्यात दिवसभरात ८ सहस्र १८ चाचण्यांत ३ सहस्र १०१ कोरोनाबाधित आढळले

कळंगुट, कांदोळी, हडफडे आणि नागोआ हे भाग १० दिवसांसाठी प्रतिबंधित क्षेत्र करणार

गोव्यात आज सायंकाळपासून ४ दिवसांसाठी दळणवळण बंदी

कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी राज्यशासनाने २९ एप्रिल या दिवशी सायंकाळी ७ वाजल्यापासून ३ मे या दिवशी सकाळी ६ वाजेपर्यंत दळणवळण बंदीची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी २८ एप्रिल या दिवशी दुपारी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली.

पर्यटकांना सत्तरीतील उस्ते बंधार्‍यावर प्रवेश न देण्याचा नगरगाव पंचायतीचा निर्णय

२६ एप्रिलपासून कोणाही बाहेरील व्यक्तीला सत्तरी तालुक्यातील उस्ते बंधार्‍यावर प्रवेश दिला जाणार नाही.

सिरम इन्स्टिट्यूटकडून लस उपलब्ध झाल्यास गोव्यात १ मे पासून १८ ते ४५ वर्षे वयोगटातील नागरिकांचे लसीकरण

सध्या लसीचा पुरवठा करणे शक्य नसल्याचे सिरम इन्स्टिट्यूटकडून सांगण्यात आले आहे.

कोरोनाविषयक चाचणी झालेल्या रुग्णांचा अहवाल येण्याआधीच औषधोपचार चालू केले जातील !  विश्‍वजित राणे, आरोग्यमंत्री

गोवा वैद्यकीय महाविद्यालयात १ कोटी लिटर ऑक्सिजनची आवश्यकता !  डॉ. शिवानंद बांदेकर