पर्यटकांना सत्तरीतील उस्ते बंधार्‍यावर प्रवेश न देण्याचा नगरगाव पंचायतीचा निर्णय

वाळपई-   कोरोनाचे प्रमाण वाढत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर सत्तरी तालुक्यातील उस्ते बंधार्‍यावर येणार्‍या पर्यटकांना प्रवेश न देण्याचा निर्णय नगरगाव ग्रामपंचायत आणि उस्ते येथील नागरिक यांनी घेतला आहे. २६ एप्रिलपासून कोणाही बाहेरील व्यक्तीला या ठिकाणी प्रवेश दिला जाणार नाही.