पणजी, २८ एप्रिल (वार्ता.) – गोव्यात कोणतेही औषध, रेमडेसिवीर इंजेक्शन आणि ऑक्सिजन सिलिंडर यांचा काळाबाजार होत असल्याचे एकही प्रकरण नाही, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. कोरोनाच्या रुग्णांसाठी राज्याच्या प्रशासनाकडून भारत सरकारने ऑक्सिजन पुरवठा करणार्यांची माहिती मागवली आहे.
२७ एप्रिलला ऑनलाईन पद्धतीने घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत पुढे म्हणाले, ‘‘स्थलांतरित कामगारांनी गोवा सोडून जाऊ नये, अशी मी विनंती करतो. उद्या मार्गदर्शक तत्त्वे सविस्तरपणे घोषित केली जातील. यातून दळणवळण बंदीच्या वेळी कोणत्या गोष्टींना अनुमती आहे आणि कोणत्या गोष्टींना नाही, हे स्पष्ट होईल. जर पुढील ४ दिवस लोक घराबाहेर पडले नाहीत, तर आम्ही ही कोरोनाची साखळी तोडण्यात यशस्वी होऊ.’’