गोव्यात यंदा ८ जूनला पाऊस : वेधशाळेचा अंदाज

नैऋत्य पाऊस भारतीय उपखंडात ४ जून या दिवशी पोचणार आहे. पाऊस ४ जूनला केरळ किनारपट्टीला धडक देणार आहे, तर ८ ते ९ जूनपर्यंत पाऊस गोव्यात पोचणार आहे, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

गोव्याचा इतिहास पोर्तुगिजांच्या अत्याचारांनी भरलेला आहे, हे स्वीकारा ! 

गोव्याचा इतिहास हा पोर्तुगिजांच्या अत्याचारांनी भरलेला आहे. गोमंतकियांनी हे सत्य स्वीकारले पाहिजे. गोव्यात मंदिरे उद्ध्वस्त करण्यात आली आणि चर्च बांधण्यात आले. गोव्यात धर्मांतर करण्यात आले.

गोवा : वनक्षेत्रांना लागलेली आग नैसर्गिक कि मानवनिर्मित ?

ज्यात मागील २ मासांत वनक्षेत्राला मोठ्या प्रमाणात आगी लागल्या आहेत. वन खात्याने यापूर्वी दिलेल्या माहितीनुसार मार्च मासाच्या पहिल्या पंधरवड्यात खासगी वनक्षेत्रांत ७४ ठिकाणी, तर ३ वन्यजीव अभयारण्यांमध्ये ३२ ठिकाणी आगी लागल्या.

‘आप’च्या गोव्यातील निवडणूक प्रचाराशी संबंधित वृत्तवाहिनीचा अधिकारी हवाला व्यवहारावरून ‘सी.बी.आय.’च्या कह्यात

‘चेरियट इंडिया’कडे गोव्यातील विधानसभा निवडणुकीचे ‘आम आदमी’ पक्षाचे प्रसिद्धी मोहिमेचे दायित्व होते. याला ‘इंडिया अहेड न्यूज’ या वृत्तवाहिनीच्या अरविंद कुमार सिंह याने १७ कोटी रुपये हवालाच्या माध्यमातून पाठवल्याचा आरोप आहे.

म्हादईचे पाणी कर्नाटकला कदापि वळवू देणार नाही ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

‘‘म्हादईविषयी गोव्याचा न्यायालयीन लढा चालू आहे. आम्ही गोव्याच्या हक्काचे पाणी कोणत्याही परिस्थितीत कर्नाटकला वळवू न देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. गोवा सरकार म्हादईसंबंधीच्या स्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.

गोवा : ‘आय.एन्.एस्. मुरगाव’ युद्धनौकेवरून ‘ब्रह्मोस’ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

भारतीय नौदलाने १४ मे या दिवशी ‘आय.एन्.एस्. मुरगाव’वरून ‘ब्रह्मोस सुपरसोनिक क्रूझ’ क्षेपणास्त्राची यशस्वीरित्या चाचणी केली. ‘आय.एन्.एस्. मुरगाव’वरून क्षेपणास्त्राची घेण्यात आलेली ही पहिलीच चाचणी आहे.

गोवा : शिक्षण खात्याकडून नवीन विद्यालयांना मान्यता नाही

एका बाजूने सरकारी शाळा बंद होत आहेत, तर नवीन खासगी शाळा उघडण्यासाठी अनेक अर्ज शिक्षण खात्याकडे येत आहेत. शिक्षण उपसंचालक आणि शिक्षण साहाय्यक भाग निरीक्षक यांनी दिलेल्या अहवालाच्या आधारे शिक्षण खात्याने नवीन शाळांचे अर्ज फेटाळले आहेत.

शंखवाळ (सांकवाळ) येथे वारसा स्थळी चर्च संस्थेने अनधिकृतपणे फेस्ताचे (जत्रेचे) आयोजन केल्याचे उघड

सांकवाळ येथील वारसा स्थळाच्या संरक्षणाकडे कानाडोळा करणारा पुरातत्व विभाग आणि त्याचे अधिकारी पुरातन श्री विजयादुर्गादेवीच्या मंदिराला न्याय देण्यासाठी कितपत यशस्वी ठरणार ?

गोवा : मुरगाव पालिकेचे प्रतिदिन २० कुत्र्यांच्या निर्बिजीकरणाचे ध्येय

‘कुत्र्यांचे निर्बिजीकरण करणे योग्य आहे; मात्र सध्या भटकी कुत्री नागरिकांचे चावे घेत आहेत. त्यावर उपाययोजना काय आहे ?

गोवा : मुरगाव आणि सासष्टी पाठोपाठ सांगे येथेही शिधापत्रिकाधारकांना बुरशीजन्य तांदुळाचे वितरण

यापूर्वी तूरडाळीचे प्रकरण राज्यात गाजले होते. या प्रकरणाला १० मास उलटूनही त्याचा सोक्षमोक्ष लागलेला नाही. ‘बुरशीजन्य तांदुळाच्या वितरणाच्या चौकशीचेही असेच होणार का?’, असा प्रश्न स्वस्त धान्य दुकानदारांना पडला आहे.