आतंकवाद्यांना होणारा अर्थपुरवठा बंद झाला पाहिजे ! –  भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर

गोवा येथील शांघाय सहकार्य परिषद
जयशंकर यांनी भुट्टो यांच्याशी संवाद टाळला !  

नैसर्गिक आपत्तीप्रवण ठिकाणची निवासस्थाने रिकामी करा !

रहिवासी ऐकत नसतील आणि खरोखरच काही आपत्ती ओढवली अन् जीवितहानी झाली, तर पालिका प्रशासन त्यांच्यावर दायित्व ढकलू शकते का ?

फोंडा आणि सांखळी येथे आज पालिका निवडणुकीसाठी मतदान

आज फोंडा आणि सांखळी येथील नगरपालिकांची निवडणूक होणार असून मतदानाची वेळ सकाळी ८ ते सायंकाळी ५ अशी आहे. मतदानानंतर ७ मे २०२३ या दिवशी मतमोजणी करून निकाल घोषित केला जाईल.

गोवा येथे शांघाय सहकार्य परिषदेला प्रारंभ

२ दिवसीय परिषदेत अनेक देशांचे परराष्ट्रमंत्री सहभागी झाले आहेत. पहिल्या दिवशी भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी चीन आणि रशिया यांच्या परराष्ट्रमंत्र्यांशी द्विपक्षीय चर्चा केली.

ध्वनीप्रदूषणासंबंधी लेखी तक्रारीची वाट पाहू नका, तत्परतेने कारवाई करा ! – गोवा खंडपिठाचा पोलीस महासंचालकांना आदेश

तक्रारी करूनही कारवाई न करणारे पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी यांच्यावरच कारवाई झाली पाहिजे. सुव्यवस्था राखू न शकणारे पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी यांना जनतेने कर भरून पोसायचे कशाला ?

गोव्यात आजपासून शांघाय सहकार्य संघटनेची परिषद

परिषदेमध्ये तालीबान राजवटीखाली असलेले अफगाणिस्तान हे आतंकवादाचे निर्मिती केंद्र बनत असल्याची भीती, तसेच नागरिकांची सुरक्षा, प्रादेशिक विषय आदी महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.

जगाच्या पाठीवर कुठूनही भक्तगण गोव्यातील कुलदेवतेची ‘व्हर्च्युअल’ पूजा करू शकणार ! – पर्यटनमंत्री रोहन खंवटे

मंगेशी, कवळे, रामनाथी, तांबडी सुर्ला येथील मंदिरांना प्रतिवर्ष अनेक पर्यटक भेट देतात. आध्यात्मिक पर्यटनाला चालना देण्याबरोबरच याच परिसरातील पर्यावरणपूरक स्थानांना भेट देण्यासाठी योजना आहे.

शालेय विद्यार्थ्यांचा अमली पदार्थ व्यवहारामध्ये सहभाग असल्याच्या प्रकरणांचे अन्वेषण करा ! – बाल हक्क संरक्षण आयोग

शालेय विद्यार्थ्यांना अमली पदार्थ व्यवसायात गोवले जात आहे. अशा गंभीर प्रकरणांचे अन्वेषण पोलीस स्वतःहून का करत नाहीत ? मागणी का करावी लागते ?

गोवा : सांगे येथील पुरातन स्थळी अवैध चिरेखाणीवर कारवाई न केल्याच्या प्रकरणी गोवा खंडपिठाचे सरकारवर ताशेरे

गोवा खंडपिठाने अनधिकृत चिरेखाण व्यवसायावर आळा घाळण्यासाठी गोवा सरकारने लेखी स्वरूपात ‘प्रोटोकॉल’ सिद्ध करण्यास सांगितले आहे. या प्रकरणी पुढील सुनावणी २१ ऑगस्ट २०२३ या दिवशी होणार आहे.

कर्नाटकात भाजपनंतर आता काँग्रेसकडून मतदारांना म्हादई प्रकल्प प्राधान्याने पूर्ण करण्याचे आश्वासन

कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या वाचनाम्यात कृषीक्षेत्रासाठी १ लाख ५० सहस्र कोटी रुपयांचे प्रावधान करणार असल्याचे म्हटले आहे. यामध्ये म्हादईचे पाणी वळवणारा वादग्रस्त कृषीप्रकल्प याचा समावेश आहे.