भाजप ‘आप’चे ४० आमदार फोडण्याच्या प्रयत्नात !  – ‘आप’चे आमदार दिलीप पांडे यांचा आरोप

या संदर्भात आपने सर्व आमदारांची बैठक बोलावली होती; मात्र बैठकीपूर्वी पक्षाचा अनेक आमदारांशी संपर्क होऊ शकला नव्हता.

‘टोमॅटो फ्लू’चे रुग्ण वाढत असल्याने केंद्रशासनाकडून मार्गदर्शक सूचना जारी

देशात केरळनंतर कर्नाटक, तमिळनाडू आणि ओडिशा या राज्यांमध्ये ‘टोमॅटो फ्लू’चे रुग्ण आढळले आहेत. आतापर्यंत ८२ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.

बेनामी संपत्तीसाठी ३ वर्षांच्या कारावासाचा कायदा रहित !

बेनामी संपत्तीसाठी ३ वर्षांच्या कारावासाचा कायदा रहित करण्यात आला. मालमत्ता जप्त करण्याचा अधिकार मागील प्रमाणे लागू होणार नाही, असेही न्यायालयाने म्हटले आहे.

निवडणूक आयोग जनतेला आश्‍वासने देण्यापासून राजकीय पक्षांना कसे काय रोखू शकतो ? – सर्वोच्च न्यायालय

निवडणुकीच्या वेळी जनतेला विनामूल्य गोष्टी देण्याच्या विरोधात प्रविष्ट करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी करतांना न्यायालयाने वरील प्रश्‍न उपस्थित केला.

रामदेवबाबा जे सांगतात त्याचे अनुसरण करून लोक बरी होतील, याची काय निश्‍चिती ? – सर्वोच्च न्यायालय

सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला या संदर्भात उत्तर सादर करण्याचे निर्देश देत नोटीस बजावली आहे.

पाकिस्तानी गुप्तहेराला देहलीत अटक

पाकिस्तान भारताच्या विरोधात कोणकोणत्या क्लुप्त्या लढवत आहे, हेच यातून स्पष्ट होते. अशा पाकला समूळ नष्ट केल्यासच सर्व समस्या सुटू शकतील, हे सरकारने जाणावे !

‘झोमॅटो’च्या विरोधात तक्रार प्रविष्ट !

झोमॅटोच्या विज्ञापनातून हा अवमान करण्यात आला होता. या विज्ञापनामध्ये अभिनेते हृतिक रोशन यांनी काम केले होते. त्यामुळे हृतिक रोशन, झोमॅटोचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिपिंदर गोयल यांच्या विरोधात ही तक्रार प्रविष्ट करण्यात आली आहे.

आम आदमी पक्ष फोडून भाजपमध्ये आल्यास सर्व खटले मागे घेऊ !

भाजपकडून प्रस्ताव आल्याचा देहलीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांचा दावा

बँकांच्या तपासणीतच आढळल्या दोन सहस्र रुपयांच्या १३ सहस्र ६०४ बनावट नोटा !

बनावट नोटा रोखण्यासाठी प्रयत्न करूनही त्या भारताच्या चलनात सापडणे, हे यंत्रणांना लज्जास्पद !

चीनने तैवानवर नियंत्रण मिळवल्यास त्याचे पुढील लक्ष्य अरुणाचल प्रदेश !

चीनच्या सैन्याने तैवानवर नियंत्रण मिळवले, तर त्याचे पुढील लक्ष्य अरुणाचल प्रदेश असेल, असे विधान संरक्षण आणि परराष्ट्रतज्ञ ब्रह्मा चेलानी यांनी केले आहे.