सनातनची ग्रंथमालिका : निरोगी आणि शतायुषी होण्यासाठी ‘आयुर्वेद’ !
डॉक्टर, तसेच वैद्याचार्य सद्गुरु (कै.) वसंत बाळाजी आठवले आणि डॉ. कमलेश वसंत आठवले लिखित सनातनचे आयुर्वेदीय मालिकेतील ग्रंथ !
डॉक्टर, तसेच वैद्याचार्य सद्गुरु (कै.) वसंत बाळाजी आठवले आणि डॉ. कमलेश वसंत आठवले लिखित सनातनचे आयुर्वेदीय मालिकेतील ग्रंथ !
जेव्हा वात, पित्त आणि कफ यांनी युक्त आणि पूर्णपणे न पचलेले थोडेसे अन्न पोटात शिल्लक रहाते, तेव्हा ते तेजावर (जठराग्नीवर) आवरण घालू शकत नाही. त्यामुळे जेवण पूर्णपणे पचलेले नसतांनाही भूक लागते.
रात्रीचे जेवण पचलेले नसतांना सकाळी अल्पाहार करणे, हे अन्नविष निर्मितीचे पुष्कळ मोठे कारण आहे. चरक, सुश्रुत, वाग्भट इत्यादी सर्व आयुर्वेद महर्षींनी विशेषतः रात्रीचे अन्न पचलेले नसतांना दुसरे अन्न ग्रहण करू नका’, असे वारंवार सांगितले आहे.
सकाळी अल्पाहाराच्या वेळेस रात्रीचे जेवण पचलेले नसते; पण नेहमीच्या सवयीमुळे भूक लागते आणि आपण अल्पाहार करतो.
‘आयुर्वेदामध्ये एवढे सारे लिहिण्यासारखे असतांना तुम्ही केवळ ‘सकाळी अल्पाहार करू नका आणि त्या वेळेत व्यायाम करा’, असे का लिहिता ?’, याचे उत्तर . . .
‘आयुर्वेद’ या भारतीय वैद्यकशास्त्राचे महत्त्व पाश्चात्त्यांना समजले आहे; म्हणून ते आयुर्वेदाच्या औषधांचे ‘पेटंट’ घेऊ पहातात. दुर्दैवाने भारतियांना आयुर्वेदाचे महत्त्व वाटत नाही ! ‘ॲलोपॅथी’त नव्हे, तर आयुर्वेदात रोग मुळापासून नष्ट करण्याची क्षमता आहे !
पाण्याच्या टाकीच्या तळाशी भोक पडलेले असतांना तिच्यामध्ये पाणी भरण्याचा कितीही प्रयत्न केला, तरी टाकी भरणार नाही. त्याप्रमाणे विकारांची वर सांगितलेली कारणे चालू असतांना कितीही औषधे घेतली, तरी कोणताही विकार बरा होणार नाही. आरोग्य हवे असेल, तर वेळीच सतर्क होऊन दिनचर्येतील चुका टाळायला हव्यात.’
‘जर तुम्ही नेहमी सकाळी ८ वाजता अल्पाहार करत असाल, तर पुढचे २-३ दिवस तो ८.३० वाजता करावा. असे प्रत्येक २-३ दिवसांनी अल्पाहाराची वेळ ३०-३० मिनिटे पुढे ढकलत रहावे. ही वेळ जेव्हा सकाळी ११ च्या जवळ येईल, तेव्हा थेट जेवून घ्यावे. अल्पाहार करणे शरिराच्या दृष्टीने आवश्यक नसते.
सूर्य वर येऊन आजूबाजूचे दव निघून गेल्यानंतरच ज्याप्रमाणे पालापाचोळा सहजपणे जाळता येतो, त्याप्रमाणे सूर्य वर आल्यावर अन्नही चांगले पचते. यामुळे अल्पाहार न करता सकाळी ११ नंतर चांगली भूक लागेल तेव्हा थेट जेवलेलेच चांगले.
‘निरोगी जीवनासाठी आयुर्वेद’ ही लेखमालिका वाचून अनेक जण आरोग्यप्राप्तीसाठी नियमित प्रयत्न करत आहेत. या प्रयत्नांमध्ये सातत्य असणे पुष्कळ महत्त्वाचे आहे. यासाठी जिभेवर नियंत्रण आवश्यक असते.