आरोग्यप्राप्तीसाठी प्रयत्न करणार्‍या साधकांनो, संयमाच्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण व्हा !

निरोगी जीवनासाठी आयुर्वेद : लेखांक ११०

वैद्य मेघराज पराडकर

‘आजकाल लग्नसमारंभामध्ये येणार्‍या बहुतेकांचे लक्ष जेवणाच्या पदार्थांकडेच अधिक असते. दुर्दैवाने आधुनिकतेच्या नावाखाली ‘चायनीज’, ‘मायोनीज (एका आधुनिक पदार्थाचे नाव)’, ‘मंच्यूरियन’ इत्यादी अन्नपदार्थांचे हानीकारक प्रकार अशा समारंभांमध्ये पहायला मिळतात आणि येणारे लोक त्यांवर ताव मारतांना दिसतात. ‘निरोगी जीवनासाठी आयुर्वेद’ ही लेखमालिका वाचून अनेक जण आरोग्यप्राप्तीसाठी नियमित प्रयत्न करत आहेत. या प्रयत्नांमध्ये सातत्य असणे पुष्कळ महत्त्वाचे आहे. लग्नसमारंभाचे जेवण पाहिल्यावर मोह होऊन अती खाण्याने प्रयत्नांतील सातत्य खंडित होते. तसे होऊ नये, यासाठी जिभेवर नियंत्रण आवश्यक असते. असे समारंभ ही आपल्या संयमाची परीक्षा असते आणि आपण त्यात उत्तीर्ण व्हायला हवे.’

– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (४.१२.२०२२)


‘निरोगी जीवनासाठी आयुर्वेद’ या लेखमालिकेत दिल्याप्रमाणे कृती करून आलेले अनुभव कळवण्यासाठी किंवा यासंदर्भात काही सुचवण्यासाठी संपर्क पत्ता

वैद्य मेघराज पराडकर

पत्ता : २४/ब, सनातन आश्रम, रामनाथी, फोंडा, गोवा. पिन ४०३४०१

ईमेल : [email protected]