शरिरात ‘ड’ जीवनसत्त्व निर्माण होण्यासाठी उन्हाचा त्वचेशी थेट संपर्क आवश्यक !

‘काचेतून येणार्‍या सूर्यकिरणांमध्ये ‘ड’ जीवनसत्त्वाच्या निर्मितीसाठी आवश्यक असे अतीनील किरण गाळले जाण्याची शक्यता असते. त्यामुळे उन्हाचा त्वचेशी थेट संपर्क येईल, असे पहावे.’

कोणत्या प्रकारच्या पोटदुखीमध्ये पाणी पिऊ नये ?

‘तीव्र पोटदुखी आणि एकापेक्षा अधिक उलट्या झाल्या असतील, तर पोटाचा गंभीर विकार असू शकतो, अशा रुग्णांनी तोंडाने पाणीसुद्धा घेणे धोक्याचे असते. त्यामुळे असा प्रसंग ओढवल्यास घरगुती उपचार न करता तातडीने आधुनिक वैद्यांना दाखवावे.’

भगवंताची कृपा आणि वाचकांनी भरभरून दिलेले प्रेम यांमुळेच ‘निरोगी जीवनासाठी आयुर्वेद’ लेखमालिकेचे १०० भाग पूर्ण !

भगवान धन्वन्तरि आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांची कृपा, तसेच वाचकांनी भरभरून दिलेले प्रेम यांमुळे ‘निरोगी जीवनासाठी आयुर्वेद’ या लेखमालिकेचा शंभरावा भाग आज प्रकाशित होत आहे. त्या निमित्ताने . . .

ऋतूंनुसार पाण्यात घालण्याची औषधे

‘थंडी आणि पावसाळा यांत सुंठ, तर उष्णतेच्या दिवसांत वाळा घातलेले पाणी प्यावे. यामुळे त्या त्या ऋतूंत सामान्यपणे होणारे विकार टाळण्यास साहाय्य होते.

ताप असतांना कोणते पाणी प्यावे ?

‘ताप असतांना साधे पाणी पिऊ नये. एक लिटर पाण्यामागे पाव चमचा या प्रमाणात ‘सनातन मुस्ता (नागरमोथा) चूर्ण’ घालून ५ मिनिटे पाणी उकळावे. हे पाणी तहान लागेल तेव्हा थोडे थोडे कोमट करून प्यावे. असे पाणी प्यायल्याने ताप उतरण्यास साहाय्य होते आणि शक्तीही टिकून राहते.’

एकाएकी उद्भवणारी पोटदुखी आणि पाणी

कोणत्याही कारणामुळे एकाएकी पोट दुखत असेल, तर २ ते ४ पेले कोमट पाणी प्यावे आणि स्वस्थ बसून रहावे. पाणी प्यायल्याने काही अपाय होत नाही. अधिकचे पाणी काही वेळाने लघवीवाटे बाहेर निघून जाते. पाणी पिऊन २ घंट्यांनीही बरे न वाटल्यास मात्र तज्ञांचा समादेश (सल्ला) घ्यावा.

पाण्याऐवजी सरबत प्यावे का ?

कधीतरी गंमत म्हणून सरबत प्यायल्यास चालते; परंतु प्रतिदिन सरबत पिण्याची सवय आरोग्याला चांगली नसते. सरबतातून अनावश्यक साखर पोटात जाते. साखर आरोग्याला हानीकारक असते. त्यामुळे सरबताऐवजी साधे पाणीच प्यावे.

पाणी उष्ण (गरम) कि थंड प्यावे ?

‘थंडीच्या दिवसांत उष्ण, तर उष्णतेच्या दिवसांत थंड पाणी प्यावे. थंड, म्हणजे शीतकपाटातील नव्हे. उन्हाळ्यात माठातील (मातीच्या मडक्यातील) पाणी प्यायल्याने मन प्रसन्न होते. अन्य ऋतूंमध्ये माठातील पाणी पिऊ नये. विकार असतांना उकळलेले पाणी कोमट किंवा थंड करून प्यावे.’

पोट साफ होत नसल्यास अधिक वेळा थोडे थोडे पाणी प्यावे

ठिबक सिंचनामध्ये एका वेळी अधिक पाणी न देता थेंब थेंब पाणी दिले जाते. या पाण्याचा झाडाला पुरता उपयोग होतो. त्याप्रमाणे शरिरालाही पुरेसे पाणी मिळावे, यासाठी एकाएकी गटागट पाणी न पिता थोड्या थोड्या वेळाने एकेक घोट प्यावे.

‘दिवसभरात ८ पेले पाणी प्यावे’, हे योग्य आहे का ?

‘व्यक्ती तितक्या प्रकृती’ असल्याने प्रत्येक व्यक्तीची पाण्याची आवश्यकता वेगळी असू शकते. त्यामुळे पाणी किती प्यावे, यासंबंधी स्वतःच्या बुद्धीने निर्णय घेण्यापेक्षा ईश्वरी संवेदनेनुसार तहान लागते, तेव्हा थोडे थोडे पाणी प्यावे.’