निरोगी जीवनासाठी आयुर्वेद : लेखांक ११२
‘जर तुम्ही नेहमी सकाळी ८ वाजता अल्पाहार करत असाल, तर पुढचे २-३ दिवस तो ८.३० वाजता करावा. असे प्रत्येक २-३ दिवसांनी अल्पाहाराची वेळ ३०-३० मिनिटे पुढे ढकलत रहावे. ही वेळ जेव्हा सकाळी ११ च्या जवळ येईल, तेव्हा थेट जेवून घ्यावे. अल्पाहार करणे शरिराच्या दृष्टीने आवश्यक नसते. अशा रितीने हळूहळू; पण नियमित प्रयत्न केल्यास अल्पाहार सहजपणे सोडता येतो.
अल्पाहार बंद असतांना सकाळी घेण्याच्या मधुमेहासाठीच्या गोळ्या चालूच ठेवल्याने काही वेळा रक्तातील साखर आवश्यकतेपेक्षा न्यून होऊ शकते. त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांनी ‘अल्पाहार सोडायचा असल्याने सकाळच्या मधुमेहासाठीच्या गोळ्या किंवा इन्सुलिन कधी घ्यावे’, हे या क्षेत्रातील तज्ञ वैद्य किंवा आधुनिक वैद्य यांना विचारून घ्यावे.’
– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१०.१२.२०२२)
‘निरोगी जीवनासाठी आयुर्वेद’ या लेखमालिकेत दिल्याप्रमाणे कृती करून आलेले अनुभव कळवण्यासाठी किंवा यासंदर्भात काही सुचवण्यासाठी संपर्क पत्ता
वैद्य मेघराज पराडकर
पत्ता : २४/ब, सनातन आश्रम, रामनाथी, फोंडा, गोवा. पिन ४०३४०१
ईमेल : [email protected]