१. सौ. प्रतिभा चव्हाण, कणकवली, सिंधुदुर्ग
अ. ‘हनुमानचालिसा पठण करण्यापूर्वी मला ‘त्यातील उच्चार कठीण आहेत’, असे वाटून हनुमानचालिसा केवळ ऐकत राहूया’, असे वाटले; मात्र भ्रमणभाषवर हनुमानचालिसा लावल्यावर आपोआप आमचे सूर जुळले.
आ. हनुमानचालिसा म्हणतांना ‘मी रामराज्यातच आहे. माझे अनिष्ट शक्तींपासून रक्षण होत आहे. मी वेगळ्याच विश्वात आहे’, असे मला वाटले. त्या वेळी ‘मी कुठे आहे ?’, याचे मला भान नव्हते.
इ. मला मध्येच सद्गुरु सत्यवान कदम यांची आठवण येऊन माझा भाव दाटून आला. मला प्राणप्रिय गुरुमाऊली आणि सद्गुरु सत्यवानदादा यांची पुष्कळ आठवण आली अन् माझी भावजागृती झाली.
ई. हनुमानचालिसा पठण पूर्ण झाल्यानंतर ‘जागेवरून उठूच नये. त्याच स्थितीत बसून रहावे’, असे मला वाटत होते. मला घरातील वातावरणात वेगळाच पालट जाणवत होता. मला पुष्कळ प्रसन्न आणि आल्हाददायक वाटत होते.’
२. सौ. प्राजक्ता सावंत, कणकवली, सिंधुदुर्ग.
अ. ‘हनुमानचालिसा पठण करण्यापूर्वी माझ्याकडून मारुतिरायाला संपूर्ण शरणागतीने प्रार्थना झाली.
आ. मला सूक्ष्मातून दिसले की, हनुमंत लहान रूपांत बसलेल्या सर्व साधकांभोवती गोल वर्तुळाकारात फिरत आहे. मला त्याची अनेक रूपे दिसली.
इ. पठण चालू झाल्यावर मला आरंभी पुष्कळ ऊर्जा जाणवली.
ई. त्यानंतर मला पूर्ण वास्तूत थंडावा जाणवत होता. अन्य साधकांनाही वातावरणात गारवा जाणवत होता.
उ. ‘माझ्यासमोर आसंदीत सद्गुरु सत्यवानदादा विराजमान आहेत’, असे मला सूक्ष्मातून दिसत होते.
ऊ. मी काही क्षण निर्विचार स्थिती अनुभवली.’
३. श्री. प्रदीप सावंत, कणकवली, सिंधुदुर्ग.
३ अ. हनुमानाच्या चित्रात सद्गुरु सत्यवान कदम यांचा हसरा चेहरा दिसणे : ‘हनुमान चालिसा पठणाला आरंभ झाल्यानंतर २ – ३ मिनिटांनी समोर ठेवलेल्या हनुमानाच्या चित्रात मला सद्गुरु सत्यवानदादा दिसत होते. मला सद्गुरु सत्यवानदादांचा हसरा चेहरा सतत दिसत होता.’
४. सौ. भारती सावंत, कणकवली, सिंधुदुर्ग.
४ अ. ‘शारीरिक त्रासांवर मात करण्यासाठी मारुतिरायाने शक्ती दिली’, असे जाणवणे : ‘मला शनिवार सकाळपासून पुष्कळ त्रास होत होता. मला उलट्या होत होत्या. त्यामुळे मी झोपूनच होते. मला काहीच करता येत नव्हते. मला सकाळी पावणेअकरा वाजता हनुमान चालिसा पठण करण्याची आठवण झाली. ‘मारुतिराया मला शक्ती देत आहेत’, असे जाणवून मी वैयक्तिक आवरून पठणाला बसले. मला त्या सव्वा घंट्यात त्रासाची जाणीवही झाली नाही.
४ आ. मला सद्गुरु सत्यवानदादांचे स्मरण होत होते. मला सद्गुरु सत्यवानदादांमध्ये नेहमी मारुतितत्त्व अनुभवायला येते.’
५. कु. प्रतीक्षा परब, कुडाळ सेवाकेंद्र, सिंधुदुर्ग.
अ. ‘हनुमानचालिसा पठण चालू होताच मला कुरूक्षेत्रावरील अर्जुनाच्या रथावर विराजमान झालेल्या मारुतिरायाचे दर्शन झाले.
आ. त्यानंतर लगेचच माझ्या डोळ्यांसमोर ब्रह्मोत्सवातील प.पू. गुरुदेव, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या रथावर विराजमान झालेल्या मारुतिरायाचे रूप आले. त्या वेळी माझ्या मनात विचार आले, ‘पुढे येणार्या आपत्काळातही मारुतिराया गुरुदेव आणि साधक यांच्या रक्षणासाठी अन् त्यांना बळ प्रदान करण्यासाठी अखंड समवेत असणार आहे.’ माझ्या मनात हे विचार आले आणि मला त्याप्रमाणे दृश्य दिसत होते.
इ. माझी भावजागृतीही होत होती. माझ्या मनात केवळ कृतज्ञताभाव होता. माझी ही स्थिती पठण पूर्ण होईपर्यंत टिकून होती.
ई. माझे अनेक दिवसांपासून व्यष्टी साधनेचे प्रयत्न होत नव्हते. मला व्यष्टी साधनेचे प्रयत्न करत असतांना येत असलेल्या अडथळ्यांवर मात करता येत नव्हती. हनुमानचालिसा पठणानंतर मला पुन्हा सेवांमधून आनंद घेता येत आहे. आता मला शारीरिक, तसेच मानसिक स्तरावर येणार्या अडचणींवर मात करता येत आहे. मला त्यातून शिकायला मिळत असल्याने साधनेतील आनंद घेता येत आहे.’
६. कु. वैभवी भोवर (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के, वय २८ वर्षे), कुडाळ सेवाकेंद्र, सिंधुदुर्ग.
अ. ‘मी हनुमानचालिसा म्हणत असतांना ‘शरिरात पुष्कळ ऊर्जा निर्माण होत आहे’, असे मला जाणवत होते.
आ. हनुमानचालिसा म्हणत असतांना शेवटी प्रार्थनास्वरूप असलेला श्लोक म्हणतांना मला ‘मोठ्या मैदानात सर्व साधक एकत्रित आले आहेत आणि समोर प.पू. गुरुदेव आहेत’, असे दृश्य दिसत होते.
इ. माझ्या शरिरावर रोमांच येत होते.
ई. मला पूर्ण दिवस पुष्कळ हलकेपणा जाणवत होता.’
(लेखातील सर्व सूत्रांचा दिनांक : २.४.२०२५)
सामूहिक हनुमानचालिसा पठण कार्यक्रमात सत्संगातील जिज्ञासूंना आलेल्या अनुभूती१. श्री. शिवराम शंकर परब, केरवडे, तालुका कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग.अ. ‘हनुमानचालिसा पठण चालू असतांना ‘माझ्यात मारुतितत्त्व आले आहे’, असे मला जाणवत होते. ‘मारुतिरायांची गदा माझ्या खांद्यावरच आहे’, असे वाटून मला ‘मारुतिप्रमाणे उड्डाण करावे’, असे वाटत होते. आ. मला संपूर्ण कार्यक्रमात पुष्कळ चैतन्य जाणवले आणि आनंदही मिळाला.’ २. सौ. विनया विजयानंद परब, केरवडे, तालुका कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग.अ. ‘हनुमानचालिसाचे सामूहिक पठण चालू असतांना मला प्रत्यक्ष हनुमंताचे दर्शन होऊन माझा भाव जागृत होत होता. आ. माझ्या दोन्ही नेत्रांमधून भावाश्रू वहात होते. इ. ‘हनुमानचालिसा पठण संपूच नये’, असे मला वाटत होते.’ (लेखातील सर्व सूत्रांचा दिनांक : २.४.२०२५) |
‘शनिगोचरा’च्या निमित्ताने सप्तर्षींनी दिलेला संदेश !
‘२९ मार्च २०२५ हा दिवस हिंदु राष्ट्र स्थापनेच्या इतिहासात एक महत्त्वाचा दिवस आहे. शनि ग्रह कुंभ राशीतून मीन राशीत प्रवेश करणार आहे. यानंतर देश-विदेश, मानव-देवता, धर्म-अधर्म, राजकारण, अर्थव्यवस्था, पृथ्वी-आकाश अशा अनेक स्तरांवर कधी न घडलेले पालट होणार आहेत. या दिवशी अमावास्याही आहे. पृथ्वीवर काही ठिकाणी सूर्यग्रहणाचा प्रभाव असेल. थोडक्यात मानवी आयुष्यातील एक ‘आध्यात्मिक संधीकाल’ असे म्हणता येईल.
या संधीकालाला तोंड देण्यासाठी आणि संरक्षणासाठी सनातनच्या सर्वत्रच्या साधकांनी २९ मार्च या दिवशी सकाळी ११ ते दुपारी १२.३० या वेळेत ७ वेळा हनुमान चालिसाचे सामूहिक पठण करावे. सर्व आश्रम, सेवाकेंद्रे यांमध्येही सामूहिक पठण करावे. हनुमंत हा शनिपीडा दूर करणारा देव आहे.
– सप्तर्षी (नाडीपट्टीवाचन) (१८.३.२०२५)
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |