Mizoram Church Urges SAVE RELIGION : (म्हणे) ‘ख्रिस्ती धर्म टिकून रहावा म्हणून अधिक मुले जन्माला घाला !’

मिझोराममधील चर्चकडून चर्चच्या विवाहित सदस्यांना आदेश !

बी.सी.एम्. चर्च, मिझोराम

आयझॉल (मिझोराम) : मिझोराममधील दुसर्‍या क्रमांकाचा सर्वांत मोठा चर्च संप्रदाय असलेल्या ‘बॅप्टिस्ट चर्च ऑफ मिझोराम’ (बी.सी.एम्.) ने ख्रिस्त्यांच्या घटत्या लोकसंख्येच्या पार्श्‍वभूमीवर ‘बेबी बूम’ म्हणजेच अधिक मुले जन्माला घालण्याचे आवाहन केले आहे. ख्रिस्ती पंथाचे रक्षण व्हावे म्हणून नुकत्याच झालेल्या १२९ व्या बैठकीत चर्चच्या विवाहित सदस्यांना हे आवाहन करण्यात आले. मिझो ख्रिस्ती समुदायाचे अस्तित्व आणि ओळख टिकवून ठेवण्यासाठी ‘बी.सी.एम्.’ने लोकांना या समस्येविषयी जागरूक करण्याचा अन् त्यांना अधिक मुले जन्माला घालण्यास प्रवृत्त करण्याचा निर्णय घेतला आहे.

१. मिझोरामची एकूण लोकसंख्या १२ लाखांपेक्षा अधिक आहे; परंतु येथे जन्मदरात घट दिसून आली आहे. चर्चला चिंता आहे की, जर मिझो लोकसंख्या या दराने अल्प होत राहिली, तर त्याचा समाज, धर्म आणि चर्च यांवर नकारात्मक परिणाम होईल.

२. ख्रिस्ती तरुणांना अमली पदार्थांच्या व्यसनापासून दूर रहाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

संपादकीय भूमिका

जर एखाद्या हिंदुत्वनिष्ठ नेत्याने असे आवाहन हिंदूंना केले असते, तर एव्हाना संपूर्ण धर्मनिरपेक्षतावादी कंपूपासून पाश्‍चात्त्य प्रसारमाध्यमांपर्यंत सर्वांनी त्याच्यावर टीकेची झोड उठवून त्याच्या विरुद्ध सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट झाल्या असत्या. या घटनेत मात्र सर्वजण गप्प आहेत, हे लक्षात घ्या !