
मुंबई – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर लाडकी बहीण योजनेंर्तगत २ सहस्र १०० रुपये देऊ, असे आश्वासन दिले हेाते. यावर आमदार अनिल परब विधानपरिषदेत यांनी ‘२ सहस्र १०० रुपये कधीपासून मिळणार ?’, असा प्रश्न उपस्थित केला. त्यावर महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या, ‘‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येत्या अर्थसंकल्पात २ सहस्र १०० रुपये देऊ’, असे म्हटलेले केलेले नाही. राज्य सरकारकडून योजना घोषित केली जाते; पण (निवडणुकीतील) घोषणापत्र ५ वर्षांसाठी असते.’’