राज्यात ३६ जिल्ह्यांसाठी फक्त ४ जात पडताळणी अधिकारीच कार्यरत !

अनेक नागरिक आणि विद्यार्थी यांची प्रमाणपत्रे प्रलंबित !

पुणे – राज्यात ३६ जिल्हे आहेत. प्रत्येक जिल्ह्यासाठी एक याप्रमाणे जात पडताळणी समितीमध्ये एक अधिकारी असणे बंधनकारक आहे; पण गेल्या काही महिन्यांपासून राज्यात फक्त चारच अधिकारी कार्यरत असल्याने अनेक नागरिक, विद्यार्थ्यांची प्रमाणपत्रे प्रलंबित आहेत. जात पडताळणी प्रमाणपत्र मिळण्यासाठी ऑनलाईन अर्ज करून कागदांच्या सत्यप्रती जिल्हा कार्यालयात जमा कराव्या लागतात. सर्व कागदपत्रांची सत्यता पडताळणी झाल्यावर मूळ कागदपत्रे तपासण्यासाठी बोलावण्यात येते. कागदपत्रांमध्ये काही त्रुटी असल्यास ती पुन्हा जमा करावी लागतात. कागदपत्राची वेळेत तपासणीच होत नसल्याने जात पडताळणी प्रमाणपत्र मिळण्यास विलंब होत आहे.

संपादकीय भूमिका

राज्याच्या लोकसंख्येचा विचार करता, पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध असूनही जिल्ह्याला आवश्यक तेवढे अधिकारी नियुक्त करता न येणे लज्जास्पद ! विद्यार्थांचे प्रमाणपत्र वेळेत न मिळाल्याने होणारी हानी कोण भरून देणार ?