लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – उत्तरप्रदेशातील काही जिल्ह्यांमध्ये सध्या चालू असलेल्या रमझानच्या काळात भोंग्यांविना मशिदींवरून अजान दिली जात आहे. योगी आदित्यनाथ सरकारने धार्मिक स्थळांवरील भोंग्यांविषयी धोरण राबवले आहे. त्यामुळे मर्यादित आवाजापेक्षा आणि नियमभंग करून भोंग्यांचा आवाज करणार्या धार्मिक स्थळांवर कारवाई केली जात आहे. अशा परिस्थितीत राज्यातील संभल, बरेली, मुरादाबाद आणि अन्य जिल्ह्यांत भोंग्यांवरून अजान देणे बंद झाले आहे. अनेक मशिदींवरील भोंग्यांवर पोलिसांकडून कारवाई करत ते जप्त केले आहेत. यामुळे आता मशिदींच्या छतांवरून इमामांकडून तोंडाद्वारेच अजान दिली जात आहे.
१. ए.आय.एम्.आय.एम्.ने (ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनने, अखिल भारतीय मुस्लिम एकता संघाने) जिल्हाधिकार्यांना पत्र लिहिले आहे. यात म्हटले आहे की, सायंकाळी इफ्तारच्या (मुसलमानांनी रमझानच्या काळात उपवास सोडण्याच्या) वेळी मशिदींमध्ये केवळ २ मिनिटांसाठी भोंग्यांवरून आवाहन करण्याची अनुमती देण्याची मागणी केली आहे.
२. मशिदीच्या मौलवीचा (इस्लामच्या धार्मिक नेत्याचा) दावा आहे की, जर भोंग्यांना अनुमती मिळाली नाही, तर रमझानमध्ये सेहरीसाठी (रमझानच्या मासात पहाटे रोजा (उपवास) प्रारंभ करण्यापूर्वीच्या आहारासाठी) झांज वाजवून लोकांना आवाहन केले जाईल.
३. संभलच्या पोलीस अधीक्षकांनी म्हटले आहे की, मुसलमानांनी सरकारच्या सूचनांचे पालन करावे आणि रमझानच्या वेळी सेहरी आणि इफ्तार आयोजित करावी.
संपादकीय भूमिकाजर उत्तरप्रदेशात हे शक्य आहे, तर संपूर्ण देशात असे का होत नाही ? देशात केंद्रात आणि १८ राज्यांत भाजपचे सरकार असतांना हे कठीण नाही, असेच हिंदूंना वाटते ! |