
मुंबई – राज्यातील विधानसभा निवडणुकानंतर आता विधान परिषदेच्या ५ रिक्त जागांसाठी निवडणूक घोषित झाली आहे. २७ मार्च या दिवशी सकाळी ९ ते दुपारी ४ पर्यंत मतदान होईल. सायंकाळी ५ वाजता मतमोजणी असेल. विधानसभा निवडणुकीत विजयी झाल्यामुळे विधान परिषदेवरील ५ आमदारांच्या जागा रिक्त झाल्या आहेत. त्यामध्ये शिवसेनेचे आमदार आमशा पाडवी, राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेश विटेकर, भाजपचे आमदार प्रवीण दटके, गोपीचंद पडळकर आणि रमेश कराड या सदस्यांच्या रिक्त जागांसाठी ही निवडणूक होईल.