परदेशी बनावटीच्या दारूची ३६१ खोकी जप्त
भिवंडी – राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाला मिळालेल्या माहितीच्या आधारे त्यांनी कल्याण-भिवंडी रस्त्यावरील टेमघर परिसरातील हॉटेलजवळ पहाटे सापळा रचला. या वेळी एका टेम्पोची झडती घेण्यात आली. तेथे सॅनिटरी पॅड्सच्या खोक्यांच्या आत परराज्यातील महागड्या दारूची खोकी झाकून ठेवण्यात आलेली आढळली. या वेळी अधिकार्यांनी दारूची ३६१ खोकी, तर सॅनिटरी पॅड्सची ३६२ खोकी जप्त केली.
संपादकीय भूमिकाअसा प्रकार करणार्यांवर तात्काळ कठोर कारवाई व्हायला हवी ! |