करूनी घ्यावी मजकडून आपली भक्ती ।

‘गुरुदेवांना अंतःकरणात अनुभवता येण्यासाठी प्रार्थना करतांना ‘त्यांना कशा प्रकारे हाक मारू, म्हणजे ते येतील आणि दर्शन देतील’, असा विचार माझ्या मनात आला. त्यांच्या सुंदर मोहक चरणांचे वर्णन कितीही केले, तरी ते अल्पच आहे. याविषयी चिंतन करतांना मला सुचलेल्या ओळी पुढे दिल्या आहेत.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

जीवनी केवळ एकच ध्यास ।
व्हावी तुमची चरणप्राप्ती ।

सौ. स्‍वाती शिंदे

मनी केवळ एकच इच्छाशक्ती ।
करूनी घ्यावी मजकडून आपली भक्ती ।
न राहो आता मज कशाची आसक्ती ।।

चरणकमल आपले आहेत कोमल ।
मन माझे विसावे त्यावरी होण्या निर्मळ ।
अंतरात पसरतो भक्तीचा परिमल ।
नेत्रांतूनी माझ्या वाहे भावजल ।
शरणागत होता मस्तकी ठेविता वात्सल्यमय करकमल ।।

–  सौ. स्वाती संदीप शिंदे (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, फोंडा, गोवा.(२७.७.२०२३)