वेळवंड (भोर, पुणे) येथे ग्रामदेवतेच्या जत्रेत एका कार्यक्रमात सौ. उर्मिला मोरे यांनी स्वतः शब्दबद्ध केलेला उखाणा येथे दिला आहे. या उखाण्यातून लढाऊ वृत्ती वाढण्यास साहाय्य होईल.
जगाच्या नकाशात अनेक देशांची गोष्ट ।
पण माझ्या भारतासारखा कोणताच देश नाही श्रेष्ठ ।। १ ।।

सुंदर ती संस्कृती, महान तो धर्म ।
हिमालयासारखे रक्षण करते, माता गंगा धूते मलीन कर्म ।। २ ।।
साडे तीन शक्तीपिठे, अष्टविनायक, असती ज्योतिर्लिंगे बारा ।
अयोध्येचा राजा माझा, पहातो कारभार सारा ।। ३ ।।
४ वेद, १८ पुराणे, अमूल्य माझी श्रीमद्भगवद्गीता ।
पुण्यवान सावित्रीसमवेत, पवित्र माझी सीता ।। ४ ।।
रणरागिणी झाशीची राणी होण्याची वेळ आली आता ।
कारण असुरक्षित आहेत, माझ्या भगिनी आणि माता ।। ५ ।।
आले किती, गेले किती इंग्रजांसारखे चोर ।
झाले जरी धर्मावर आघात किती घोर ।। ६ ।।
संत, महात्मे अन् ऋषींमुळे राही भारताची पुण्याई थोर ।
राही भारताची पुण्याई थोर ।। ७ ।।
आई तुळजाभवानीच्या आशीर्वादाने छत्रपतींनी स्वराज्याला सुरुवात केली ।
करीन प्रयत्न, घडावी जिजाऊ ‘वेळवंड’च्या प्रत्येक दारी ।। ८ ।।
जय भवानी । जय शिवाजी ।।
– सौ. उर्मिला संभाजी मोरे, मु. पोस्ट वेळवंड, तालुका भोर, जिल्हा पुणे. (जानेवारी २०२५)