Punjab BJP President Sunil Jakhar’s Allegation : ‘इंडिगो’च्या विमानातील सीट तुटलेल्या अवस्थेत !

  • पंजाब भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुनील जाखड यांचा आरोप

  • केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांनीही ‘एअर इंडिया’च्या विरुद्ध केली होती तक्रार !

पंजाब भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुनील जाखड

मोहाली (पंजाब) – पंजाब भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुनील जाखड यांनी ‘इंडिगो एअरलाईन्स’च्या सेवेवर प्रश्न उपस्थित करत म्हटले की, चंदीगड ते देहली या त्यांच्या प्रवासाच्या वेळी त्यांच्या ‘सीट’चे कुशन सैल आढळले. यामुळे त्यांना प्रवासात त्रास सहन करावा लागला. याविषयी ‘क्रू मेंबर्स’कडे (विमानातील कर्मचार्‍यांकडे) तक्रार केल्यावर ते म्हणाले की, आस्थापनाच्या संकेतस्थळावर जाऊन यासंदर्भात तक्रार करावी. (अशा प्रकारे असंवेदनशीलता दाखवणार्‍या आणि स्वत:चे दायित्व झटकणार्‍या कर्मचार्‍यांवर कारवाई झाली पाहिजे ! – संपादक) प्रमुख विमान आस्थापनांचा हा ‘चलता है’ (वेळ मारून नेण्याचा) दृष्टीकोन सुरक्षा नियमांच्या विरुद्ध आहे, याकडे ‘नागरी उड्डयन महासंचालनालया’ने लक्ष दिले पाहिजे. जाखड यांनी ‘एक्स’वरून या घटनेची माहिती दिली.

शिवराज सिंह यांच्या तक्रारीनंतर केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांनी नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाला प्रकरणाची चौकशी करण्याचे आणि त्वरित सुधारणात्मक उपाययोजना सुचवण्याचे निर्देश दिले होते.

जाखड पुढे म्हणाले की…,

१. केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांनाही ‘एअर इंडिया’च्या सुविधांवर प्रश्न उपस्थित केले होते. चौहान यांना विमानात तुटलेल्या सीटवरून प्रवास करावा लागला होता.

२. जाखड यांनी २७ जानेवारीच्या इंडिगोच्या ‘चंदीगड-दिल्ली विमाना’ची काही छायाचित्रे पोस्ट केली आहेत.

संपादकीय भूमिका

सत्ताधारी पक्षातील केंद्रीय मंत्री, तसेच एका पक्षाच्या प्रदेशाध्यक्षाला असा त्रास सहन करावा लागत असेल, तर सर्वसामान्य प्रवाशांचे काय हाल होत असणार, याचा विचारच न केलेला बरा !