शिवजयंतीनिमित्त ध्‍वनीक्षेपकाला रात्री १२ पर्यंत अनुमती !

शिवजयंतीनिमित्त सकाळी ६ ते रात्री १२ पर्यंत ध्‍वनीप्रदूषण

कोल्‍हापूर – जिल्‍ह्यात १९ फेब्रुवारी या दिवशी शिवजयंतीनिमित्त सकाळी ६ ते रात्री १२ पर्यंत ध्‍वनीप्रदूषण (नियमन आणि नियंत्रण) नियम २००० च्‍या नियम ५(३) नुसार, ध्‍वनीक्षेपक आणि ध्वनीवर्धक यांचा वापर करण्यास अपर जिल्हादंडाधिकारी संजय तेली यांनी अनुमती दिली आहे.