ड्रोनद्वारे मिळालेल्या माहितीद्वारे मासेमारांवर  केली जाणारी कारवाई अन्यायकारक !

साहाय्यक मत्स्यव्यवसाय आयुक्तांना मासेमारांनी दिले निवेदन

मासेमारांनी दिले निवेदन

रत्नागिरी – ड्रोनद्वारे समुद्रकिनार्‍यावर केल्या जाणार्‍या हवाई गस्तीमध्ये किनार्‍यापासून १० वाव सागरी अंतराच्या बाहेर मासेमारी करणार्‍या नौकांची छायाचित्रे घेतली जातात आणि त्या मासेमारांवर कारवाई केली जाते. या प्रकरणी लक्ष घालून न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी येथील मासेमारांनी साहाय्यक मत्स्यव्यवसाय आयुक्त सागर कुवेसकर यांच्याकडे केली आहे.

अवैधरित्या होणारी मासेमारी रोखण्यासाठी समुद्रकिनार्‍यावर ड्रोनची गस्त चालू करण्यात आली आहे. यामुळे निर्माण होत असलेल्या अडचणी मांडण्यासाठी मासेमारांनी मत्स्य आयुक्तांची भेट घेतली. या वेळी मासेमारांचे नेते इम्रान मुकादम, दिलावर गोदड, तसेच काँग्रेसचे नेते दीपक राऊत आदी उपस्थित होते.

समुद्रकिनार्‍यावर ड्रोनची गस्त

रत्नागिरीमध्ये १० वाव अंतराच्या पुढील भागात समुद्रात मासेमारी करण्याचा नियम आहे. हा येथील मासेमारांवर अन्याय आहे. समुद्रात वारा असेल, तर १० वावच्या बाहेर मासेमारी करणे नौकांना धोक्याचे असते. अशा वेळी रत्नागिरी येथील समुद्रात मासेमारी करण्याचे अंतर ५ वावच्या पुढे असावे, अशी मागणी मासेमारांनी केली. या वेळी मासेमारांनी दिलेले निवेदन वरिष्ठ पातळीवर पाठवू, असे आश्वासन कुवेसकर यांनी दिले.