‘छावा’ चित्रपट शासनाने करमुक्‍त करावा ! – राष्‍ट्रवादी काँग्रेस

पुणे – छत्रपती संभाजी महाराज यांच्‍यावरील ‘छावा’ चित्रपट सध्‍या प्रचंड गर्दीत चालत आहे. असे असले, तरी ‘मल्टिप्‍लेक्‍स’ चित्रपटगृहांमध्‍ये तिकिटाचा दर ५०० ते ६०० रुपये आहे. जर ४ जणांचे कुटुंब असेल, तर हा व्यय २ सहस्र रुपयांपर्यंत जातो. हे मध्यमवर्गीय कुटुंबाला परवडणारे नाही. छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास सर्वांपर्यंत पोचण्यासाठी चित्रपट अधिकाधिक लोकांनी पहाणे आवश्यक आहे. त्यामुळे चित्रपट महाराष्ट्र शासनाने करमुक्त करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या चित्रपट आणि सांस्कृतिक विभागाचे अध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी मुख्यमंत्‍र्यांकडे निवेदनाद्वारे केली.