हमरापूर (छत्रपती संभाजीनगर) येथे गोमांस विक्री करणार्‍या धर्मांधाला अटक !

हबीब युसूफ कुरेशी

छत्रपती संभाजीनगर – वैजापूर तालुक्यातील हमरापूर येथे गोमांस विक्री करणार्‍या हबीब युसूफ कुरेशी याला पकडण्यात आले. ‘राष्ट्रीय श्रीराम संघा’चे अध्यक्ष सागर भैय्या बेग यांना कुरेशी हा हमरापूर येथे गोमांस विक्रीसाठी येत असल्याची माहिती मिळाली. त्यांनी हिंदु धर्मरक्षक रवींद्र पवार आणि त्यांच्या साथीदारांच्या साहाय्याने कुरेशी याचा पाठलाग करून त्याला पकडले. त्याला वीरगाव पोलिसांच्या कह्यात देण्यात आले. तेथे त्याच्यावर गुन्हा नोंद करून अटक केली. कुरेशीकडून १६ सहस्र रुपये, तसेच ६० सहस्र रुपयांचे गोमांस हस्तगत करण्यात आले.

संपादकीय भूमिका 

गोतस्करांना कायद्याचा आणि पोलिसांचा धाक नसल्याने धर्मांध वारंवार उघडपणे असे गुन्हे करतात !